महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचा वार्डात भेटीगाठी वाढल्या दिवाळीची आतिषबाजी समुचित राजकीय फटाके फुटायला सुरूवात Chandrapur Mahanagar Palika Election

महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचा वार्डात भेटीगाठी वाढल्या दिवाळीची आतिषबाजी समुचित राजकीय फटाके फुटायला सुरूवात

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 10 नवंबर: महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाचा मतदार नोंदणी हा कार्यक्रम वेगात असताना महानगर पालिका व नगरपलिकेचा कार्यक्रमा बाबत कुठलीच घोषणा नाही त्यामुळे ही निवडणुक केव्हा होणार हे निश्चित च नसले तरी जिल्ह्यात बहुंताश नगरपालिका पाच वर्षाचा कार्यकाळ दिसंबर महिन्यात संपुष्टात येत असल्याने "नगर सेवक" होण्यासाठी इच्छुक नेते वार्डावाडातील जनतेच्या भेटीगाठी वाढवित असताना दिसत आहे. दिवाळीची आतिषबाजी झाल्यानंतर राजकीय फटाके फुटायला सुरूवात झाली. अनेक इच्छुक राजकीय नेते आता फटाकेबाजी करत स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी जनतेची दिशाभुल करायचा पुढे सरसावले आहे.
(Mahanagarpalika)
(Election Commission)
(Corporator)
(Chandrapur CMC Election)

एकंदरित महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानै इच्छुक उमेदवार वार्डावार्डातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासोबत मी नियमित कामासाठी तत्पर राहील या भुमिकेतुन वावरताना दिसत आहे. तर इच्छुक राजकीय स्वार्थ साठी आरोप प्रत्यारोप करत असताना नागरिकांचे मनोरंजन होत आहे.