रितेश (रामू) तिवारी : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 11 नवंबर: भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनल्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले. त्यात मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. मौलाना आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातदेखील सहभाग घेतला होता. त्यामुळे प्रत्येकांनी मौलाना अबुल कलाम यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले.
(Maulana Abul Kalam Azad)
(Chandrapur City District Congress Comiti)
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी (ता. ११) सकाळी १०.३० वाजता येथील आझाद बगीचा येथे मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रितेश (रामू) तिवारी बोलत होते. रितेश (रामू) तिवारी पुढे म्हणाले, स्वातंत्र्योत्तर भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मौलाना अबुल कलाम उत्तरप्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून गेले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी ते एक होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे, ओबीसीचे शहराध्यक्ष नरेंद्र बोबडे, मनपा विरोधी पक्ष नेता डॉ. सुरेश महाकुळकर, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, नगरसेविका सकिना अन्सारी, विना खनके, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकार, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, गोपाल अमृतकर, बापू अन्सारी, स्वाती त्रिवेदी, चंदा वैरागडे, असंघटिक कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप सिडाम, पप्पू सिद्दीकी, नौशाद शेख, इरफान शेख, मोनू रामटेके, पितांबर कश्यप, विजय धोबे, सचिन रामटेके, अनुसूचित जाती काँग्रेसचे अध्यक्ष कृणाल रामटेके, तवंगर गुलझार, गौस खान, राजेश वर्मा, अनुसूचित जाती काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुनील पाटील, भगतताई, पूजा अहुजा, रवी रेड्डी, शुभम कोराम यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.