महत्वाचे महत्त्वाचे मुद्दे
मुंबई: गेल्या 17 दिवसांपासून संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना इतिहासातील सर्वात मोठी पगार वाढ देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल 41 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगारांच्या पगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केल्याचंही जाहीर केलं. कामगारांना पगारवाढ देण्याबरोबरच त्यांचे निलंबन आणि सेवा समाप्तीही मागे घेतल्याचं जाहीर केलं.
मंत्री अनिल परब यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ देत असल्याचं जाहीर केलं. तसेच इतिहासातील ही सर्वात मोठी पगारवाढ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं.
👉🏻 मुख्य मुद्दे
➡️ दर महिन्याच्या 10 तारखेच्या आधी पगार होणार
➡️ इतर राज्यांतील कामगारांप्रमाणे पगारवाढ देण्यात आली
➡️ मूळ पगारात 5 हजाराने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डीए, एचआर आणि सर्वचं स्लॉटमध्ये पगार वाढ होणार आहे.
➡️ विलीनीकरणाचा मुद्दा समिती समोर आहे. अहवाल आल्यावर निर्णय घेऊ
➡️ एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी समिती स्थापना करण्यात येणार आहे.
➡️ कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि सेवा समाप्ती मागे
➡️ ड्युटीवर नसतानाही कामावर हजेरी लावणाऱ्यांना त्या दिवसाचा पगार मिळणार
👉🏻वाढणार पगार
▶️ नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 5 हजार रुपये वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या पगारात 7200 रुपयांनी वाढ होणार आहे.
▶️ 10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 4 हजाराची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या पगारात 5760 रुपयांनी वाढ होणार आहे.
▶️ 20 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2500 हजाराची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या पगारात 3600 रुपयांनी वाढ होणार आहे.
▶️ 30 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2500 हजाराची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या पगारात 3600 रुपयांनी वाढ होणार आहे.