महाराष्ट्र राज्यात जर 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागल्यास लॉकडाऊन, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिला इशारा If 800 metric tons of oxygen is required in the state of Maharashtra, lockdown Health Minister Rajesh Tope gave a warning

महाराष्ट्र राज्यात जर 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागल्यास लॉकडाऊन

आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिला इशारा

#Loktantrakiawaaz
मुंबई, 25 डिसम्बर: महाराष्ट्र राज्यात तिसरी लाट (CORONA THIRD WAVE) आली तर ती ओमायक्रॉनची (Omicron) असेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.(Maharashtra Health Minister Rajesh Tope).

ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता आहे, त्यामुळेच निर्बंध लागू केले असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याची गती अशीच वाढत गेली तर तिसरी लाट तर ती ओमायक्रॉनची असेल. 

जर ओमायक्रॉनची गती आणखी वाढत गेली ऑक्सिजनच्या (Oxygen) अनुषंगाने आपण लॉकडाऊनबाबत विचार करत आहोत.(Lockdown). ज्या दिवशी 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लावावा लागणार. पण कदाचित संसर्गाची गती इतकी असेल तर 800 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता कदाचित 500  वर आणावी लागेल अशी परिस्थिती सुद्धा येऊ शकते, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
(If 800 metric tons of oxygen is required in the state of Maharashtra, lockdown, Health Minister Rajesh Tope gave a warning.).

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं होतं, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय.