AKOLA MLC ELECTION : अकोल्यातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी BJP Victory

AKOLA MLC ELECTION : अकोल्यातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, 

भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी

#Loktantrakiawaaz
अकोला, 14 डिसम्बर: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra MLC Election Result) नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. अकोला वाशिम बुलडाणा (Akola-Washim-Buldhana) मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया (Shivsena Gopikishan Bajoria) आणि भाजपचे वसंत खंडेलवाल (BJP Vasant Khandelwal) यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत.वसंत खंडेलवाल यांना 438 तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना 328 मतं मिळाली आहेत.

अकोला- वाशिम- बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला -बुलडाणा-वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते.अकोला -बुलडाणा- वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.