Big Breaking News : महाराष्ट्र विधानसभेतही कोरोनाचा शिरकाव, अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण Corona infestation in Maharashtra Legislative Assembly too, 32 people in the convention contracted corona

Big Breaking News : महाराष्ट्र विधानसभेतही कोरोनाचा शिरकाव

अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण

#Loktantrakiawaaz
मुंबई, 26 डिसम्बर : भाजप आमदार समीर मेघे (BJP MLA Sameer Meghe) यांना कोरोनाची लागण (Covid-19 Positive) झाल्यानंतर आता विधानसभेतही कोरोनाचा शिरकाव झाला असल्याची माहिती समोर आली आहे. (Corona infestation in Maharashtra Legislative Assembly too, 32 people in the convention contracted corona)

विधानसभा अधिवेशनातील (Maharashtra Assembly ) तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण झाली (32 Covid Positive) असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार समीर मेघे (BJP MLA SAMIR MEGHE)  यांनी काल फेसबुकवर पोस्ट (FACEBOOK) करत स्वतःला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. 

त्यानंतर त्यांनी स्वतःच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचा सल्लाही दिला होता. दरम्यान, आता अधिवेशनातीलच एकून 32 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
वाढत्या ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णसंख्येतच आता हिवाळी अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केलाय. कोरोनाची लागण झाल्याचं कळताच समीर मेघे हे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती बिघडल्यानं समीर मेघे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सगळेच धास्तावले होते. तर दुसरीकडे आता अधिवेशनातीलच 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.
दरम्यान, ज्या 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामध्ये किती आमदार आहेत, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. मात्र सध्यातरी याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विधानसभा अधिवेशातील पोलीस, अधिवेशनातील कर्मचारी वर्ग व पत्रकार यांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे.