#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 25 डिसम्बर: भारतीय जनता पार्टी (BJP) जैन प्रकोष्ट चंद्रपूर जिल्हा तर्फे विदर्भ विभागीय बैठक चंद्रकांता सेलिब्रेशन येथे पार पडली. बैठकीला महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख ईशा कोळेकर, चंद्रपूर महानगर भाजपा अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर चंद्रपुर मनपा राहुल पावडे, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अंजली घोटेकर, नगरसेवक व चंद्रपूर भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टुवार, भाजपा महानगर सचिव मनोज सिंघवी, नगरसेविका शीला चव्हाण, सकल जैन समाजाचे महासचिव अमर गांधी, महाराष्ट्र भाजपा जैन प्रकोष्ठ सहसचिव निर्भय कटारिया, विदर्भ विभाग महिला प्रमुख सपना कटारिया, महानगर भाजपा जैन प्रकोष्ठ चे जिल्हाध्यक्ष हेमंतराज सिंघवी, महिला अध्यक्ष अर्चना मुणोत, महिला आघाडी चे उपाध्यक्ष किरण बुटले, जैन समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। (BJP Jain Prakosht)
(Vidarbha divisional meeting held on behalf of Bharatiya Janata Party Jain Prakosht Chandrapur District.)
अध्यक्षीय भाषणात ईषा कोळेकर यांनी जैन समाजाच्या महिलांना फक्त सामाजिक नव्हे तर राजकीय क्षेत्रात सुद्धा मजल करण्यास प्रेरित केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या द्वारे देशातल्या महिलांच्या उत्थानासाठी वेगवेगळ्या योजना विषयी त्यांनी माहिती दिली.
बैठकीला मार्गदर्शन करताना भाजपा महानगर अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी कोरोना काळात चंद्रपूर जैन समाजाचा द्वारे केलेल्या विभिन्न सामाजिक कार्याची भरभरून स्तुती केली व चंद्रपूर महानगर जैन प्रकोष्ठ कार्यकारिणी द्वारे असेच विभिन्न कार्य करत राहण्यासाठी प्रेरित केले. सदर बैठकीला उपमहापौर राहुल पावडे व भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अंजली घोटेकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात चंद्रपूर महानगर कार्यकारिणी व महिला कार्यकारिणी घोषित करण्यात आली. महानगर उपाध्यक्ष पदी अभिषेक कांष्टीया, देवेंद्र डगली, विशाल मुथा, महासचिवपदी रोहन शहा, सचिन जैन, अनिल बोथरा, सहसचिवपदी निर्मल भंडारी, निखील डहाले, कार्यकारिणी सदस्य पदी त्रिशूल बंब, आनंद तालेरा, प्रतीक कोठारी, पलाश सिंघवी, रिषभ सकलेचा, प्रशांत भलगट, चेतन झांबड, महावीर बोथरा, व रुषभ पुगलिया यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच महिला अध्यक्ष पदी अर्चना मुणोत, महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिता अमर गांधी, शोभा परार्थ तालेरा, जिल्हा सचिव पदी राजश्री शैलेंद्र बैद, वंदना राहुल गोलेच्छा, सहसचिवपदी शितल देवेंद्र डगली, प्रवीणा योगेश तालेरा, तसेच कार्यकारणी सदस्य पदी शोभा हरीश मुथा, दिशा रोहन शाह, व नैना पंकज मुथा यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमात कु.आयुशी विवेक जैन चा सत्कार इशाताई कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवी अमर गांधी, संचालन सीमा प्रवीण गोठी तर आभार प्रदर्शन हेमंतराज सिंघवी यांनी केले.