चंद्रपुर: चंद्रपुर जिल्हा बार असोसिएशन चे ग्रंथालयात पाच संगणक लावले. ही संगणके विस्तारित इ-ग्रंथालय (E-LIBARARY) कक्षात ठेवण्यात आले असून त्याचे विधिवत उद्घाटन सोहळा दुपारी २.०० वाजता चंद्रपूर बार असोसिएशन च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. हे विस्तारित इ ग्रंथालय असोसिएशन च्या सर्व सभासदकरिता सुरू करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिवक्ता श्री मुंकुंद टंडन साहेब होते. मंचावर असोसिएशनचे अध्यक्ष ऍड श्री अभय पाचपोर, उपाध्यक्ष ऍड श्री राजेश ठाकूर व सचिव ऍड श्री आशिष धर्मपुरीवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिवक्ता श्री मुकुंद टंडन साहेब यांनी बारच्या स्तुत्य उपक्रमाची स्तुती केली व सदर विस्तारीत इ-ग्रंथालय चा फायदा सर्व अधिवक्ता विशेषतः नवोदित अधिवक्ता यांना होईल असे म्हटले. तसेच असोसिएशन तर्फे नवोदित वकिलांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र चे रजिस्ट्रेशन साठी नागपूर येथे २-३ वेळा जावे लागते त्यात त्यांना आर्थिक खर्च लागतो त्याकरिता चंद्रपूर येथील असोसिएशन चे कार्यालयात रजिस्ट्रेशन फॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल असोसिएशन चे कार्यकारिणीचे अभिनंदन केले.तसेच इ -ग्रंथालय करिता गुजरात अहमदाबाद येथील Levons Technologies Pvt. Ltd. यांनी चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनला १ वर्षाकरिता त्यांचे LAW SUIT हे software मोफत दिले त्यांचेसुद्धा अभिनंदन व आभार मानले.तसेच असोसिएशन चे कार्यकारीणी व ऍड अनिल ढवस ,नागपूर तसेच बार चे पूर्वीचे सदस्य तथा आताचे न्यायाधिश श्री हंसराज जी वनकर यांनी असोसिएशन चे विस्तारित इ - ग्रंथालय करीता कॉम्पुटर उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मानले.या कार्यक्रमात चंद्रपूर व बाहेरील सन्माननीय वकील मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे संचलन असोसिएशन सचिव ऍड श्री आशिष धर्मपुरीवार तर प्रस्ताविक अध्यक्ष ऍड श्री अभय पाचपोर यांनी तर आभार प्रदर्शन ऍड श्री रशीद शेख यांनी मानले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.अभय पाचपोर,उपाध्यक्ष ऍड.राजेश ठाकुर, सचिव ऍड.आशिष धर्मपूरीवार, सह सचिव ऍड.विनायक कार्लेकर,एड.राजेश झुलकंठीवार, ऍड.केनल सरोजकर, ऍड.स्नेहा खिरटकर, ऍड.स्नेहा गिरी, ऍड.मंजु लेडांगे, ऍड.कृष्णकांत रासेपल्ली, ऍड.नंदकिशोर राऊत, ऍड.उमेश मोहूर्ले, ऍड.विनोद मोटघरे, ऍड.राहुल मेंढे, ऍड.प्रफुल मुरकुटे, ऍड.रशीद शेख, ऍड.आशिष मुंधडा आणि चंद्रपुर जिल्हा बार असोसिएशन च्या इतर अनेक अधिवक्त्यांनी व कर्मचारी हेमंत ,कु कोमल पडगेलवार,श्री तुळशीराम, सौ कलाबाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.