प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा कसा असेल सविस्तर वाचा
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 28 डिसम्बर: चंद्रपुरातील महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या ७७ जागांचा आणि २६ प्रभागांचा कच्चा प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला.
(Chandrapur City Municipal Corporation)
(CMC)
(Election commission)
हा आराखडा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार वाढीव आधारे नगरसेवकांबरोबरच चंद्रपुरातील प्रभागांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.
त्यानुसार लोकसंख्येच्या आधारावर चंद्रपूर मनपा क्षेत्रातील नवीन प्रभाग प्रारूप आराखड्यात ७७ जागा आणि २६ प्रभाग आहेत . त्यामध्ये २५ प्रभागात प्रत्येकी ३ नगरसेवक आणि एका प्रभागात २ नगरसेवक असा एकूण ७७ सदस्यांचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. आता ११ नगरसेवकांची संख्या वाढणार आहे . नवीन प्रारूपानुसार ७७ जागांसाठी २६ प्रभाग तयार करण्यात आले.
चंद्रपूर मनपाच्या नवीन २६ प्रभागरचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यात आला. आयोगाकडून आराखड्याची छाननी झाल्यानंतर ज्या सूचना येतील त्यानुसार पुढील कार्यवाही करु, अंतिम आराखडा जाहीर होण्याचे टप्पे अद्याप शिल्लक आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.