BREAKING NEWS: महाराष्ट्रात कठोर निर्बंधांबाबत (Lockdown) आज, उद्यामध्येच निर्णय–आरोग्य मंत्री राजेश टोपे
#Loktantrakiawaaz
मुंबई, 30 दिसंबर : महाराष्ट्र राज्यातील रुग्णवाढ ही चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्सच्या (Maharashtra Task Force) बैठकीत महत्वाची चर्चा झाली. कठोर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thackrey) घेतील. तो निर्णय आज उद्यामध्येच घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर दिली आहे. ‘हे नक्कीच आहे की गर्दी टाळलीच पाहिजे. गर्दी नको कारण त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढेल. टेस्टिंग संदर्भात एसजीटीएफ हे कीट आहे.
त्यातून ओमिक्रॉनचं डिटेक्शन होतं. ते किट वापरलं जावं, त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचे (Delta Varient) रुग्ण किती आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Varient) रुग्ण किती हे समजेल. तर ट्रिटमेंटवर ‘मोनोपिरॅमिल’ हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील टास्क फोर्सनं मान्य केलेलं अॅन्टी व्हायरल ड्रग आहे. त्याची मागणी आणि पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहितीही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.