Maharashtra New Guideline : नवीन वर्षाच्या कार्यक्रमांना ब्रेक, महाराष्ट्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना काय? New Year stopped planning

Maharashtra New Guideline : नवीन वर्षाच्या कार्यक्रमांना ब्रेक, 

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना काय?

#Loktantrakiawaaz
मुंबई, 29 डिसम्बर:  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Welcome) जय्यत तयारी करत असाल तर सावधान. महाराष्ट्र सरकारने नव वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. तसेच चौपाट्यांवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. राज्याच्या गृहविभागाने याबाबतची नवी नियमावलीच जारी केली आहे.

कोरोनाचं संकट असल्यानेच ओमिक्रॉन विषाणूही (Omicron) पसरत आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाचं साधेपणाने स्वागत करावे, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

■ राज्य सरकार ची नविन सूचना काय?

➡️  31 डिसेंबर रोजी आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडू नका. घरीच साधेपणाने नवीन वर्षाचं स्वागत करा.

➡️  25 डिसेंबरपासून रात्री 9 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्या आदेशाचे पालन करावे.

➡️  31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागता करिता आयोजित कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित परवानगी राहणार आहे.

➡️  या कार्यक्रमांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

➡️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडणे टाळा.

➡️  31 डिसेंबर रोजी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

➡️ नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. मिरवणुका काढू नयेत.

➡️ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाट्यांवर नागरिकांनी गर्दी करू नये.

➡️  नुतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

➡️ फटाक्यांची आतीषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे.

As the threat of a possible third wave of COVID-19 looms overhead, citizens have not stopped planning their celebrations to welcome the new year, 2022. Thus, the Maharashtra government has imposed COVID guidelines for New Year celebrations, to curb the spread amid rising cases of new Omicron variant.