चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होणा-या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याबाबत जानेवारीत बैठक घेणार –आ. सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्‍या पदाधिका-यां समवेत प्रदुषणाबाबत चर्चा #preventionofpollution #ChandrapurSuperThermalPowerStation #MLASudhirMungantiwar #CSTPS #चंद्रपुरबचावसंघर्षसमिति #चंद्रपुरप्रदूषण

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होणा-या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याबाबत जानेवारीत बैठक घेणार –आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्‍या पदाधिका-यां समवेत प्रदुषणाबाबत चर्चा

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 29 डिसम्बर:  चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे (CSTPS) होणारे प्रदुषण (Pollution) व त्‍यामुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावर (Health) होणारे विपरित परिणाम ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याच्‍या दृष्‍टीने जानेवारी महिन्‍यात सर्व संबंधीत अधिका-यांची बैठक आयोजित करुन उपाययोजनेची दिशा निश्चित करु, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. २५ डिसेंबर रोजी चंद्रपूर बचाव संघर्ष समिती चंद्रपूरचे पदाधिकारी व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्‍य अभियंता सपाटे यांच्‍या समवेत आ. मुनगंटीवार यांनी हिराई विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीत चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्‍या पदाधिका-यांनी प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याच्‍या दृष्‍टीने काही मागण्‍या केल्‍या. प्रामुख्‍याने ईएसपी चे अयोग्‍यकार्य आणि जुन्‍या मशिनीमुळे चिमण्‍यांमधून निघणारी राख तसेच धुर हवेत फेकली जाते, काळा धुर अर्थात कार्बन पार्टीकल ऑक्‍सीजन सोबत पुर्णरुपाने उपयोग न होण्‍यामुळे पार्टीकलची राख होत नाही यामुळे राख आणि धुराचे प्रमाण अधिक वाढते. ईएसपीला विज निर्मितीसोबत क्‍लब करण्‍याची आवश्‍यकता आहे. ईएसपीचे योग्‍य पध्‍दतीने मेंटेंनन्‍स होत नाही अशा विविध मागण्‍या समितीच्‍या पदाधिका-यांनी केल्‍या. प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले असुन चंद्रपूर हे देशातील सर्वाधीक प्रदुषीत शहरांमध्‍ये गणले जाते. त्‍यामुळे या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याची नितांत आवश्‍यकता असल्‍याचे समितीचे पदाधिकारी म्‍हणाले. आ. मुनगंटीवार यांनी समितीच्‍या पदाधिका-यांच्‍या मागण्‍या ऐकुन घेतल्‍या व या संदर्भात जिल्‍हाधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्‍य महाप्रबंधक यांची संयुक्‍त बैठक घेवुन उपाययोजना बाबत चर्चा करु असे आश्‍वासन समितीच्‍या पदाधिका-यांना दिले.

यावेळी डॉ. गोपाल मुंधळा, डॉ. मंगेश गुलवाडे, विजय चंदावार, रामपाल सिंह, उमाकांत धांडे, प्रिती भुषणवार, डॉ. स्‍वपन दास, सुबोध कासुलकर आदींची उपस्थिती होती.. 

(MLA SUDHIR MUNGANTIWAR).
(Chandrapur Bachao Sangharsh Samiti Chandrapur office bearers and Chandrapur Super Thermal Power Station)