चंद्रपुर जिल्ह्यासाठी 10 व 11 जानेवारी रोजी ऑरेंज व यलो अलर्ट जारी
चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान्याची उचित काळजी घ्यावी
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 9 जानेवारी: मुंबई, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 10 व 11 जानेवारी 2022 रोजी दोन दिवसासाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 10 जानेवारी रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच जिल्ह्यातील एक ते दोन ठिकाणी वादळी विजेच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर 11 जानेवारी रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Chandrapur District Orange And Yellow Alert.
तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी धान्यांची उचित काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.