चंद्रपूरात अभाविपचे सुवर्ण महोत्सवी विदर्भ प्रांतीय अधिवेशन chandrapur ABVP

चंद्रपूरात अभाविपचे सुवर्ण महोत्सवी विदर्भ प्रांतीय अधिवेशन
  
 माजी केंद्रीय गृहराज्यमंत्रि
हंसराज अहीर यांचे शुभहस्ते अधिवेशन स्थळाचे भूमिपूजन

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 06 जानेवारी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) सुवर्ण महोत्सवी विदर्भ प्रांतीय 3 दिवसीय अधिवेशन चंद्रपूर या ऐतिहासिक नगरामध्ये दि 7, 8 आणि 9 जानेवारी 2022 रोजी होत आहे. सदर  अधिवेशन नागपूर महामार्गावरील शकुंतला पार्क येथे होणार असून अभाविपचे संस्थापक अध्यक्ष कै. दत्ताजी डिडोळकर स्मृतीनगरी स्थळाचे भूमीपूजन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्रि तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांचे शूभहस्ते दि 05 जानेवारी रोजी पार पडले. BJP

याप्रसंगी स्वागत समितीचे अध्यक्ष संदिप पोशेट्टीवार, सचिव रत्नाकर जैन, अभाविपचे विदर्भ प्रांत अध्यक्ष योगेश येनारकर, शक्ती केराम, अमित पटले, संयोजक प्रविण गिलबिले, जिल्हा संयोजक आशुतोष द्विवेदी, आशिष धर्मपुरीवार आदि मान्यवर उपस्थित होते.