विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थांच्या कोरोना लसीकरणाला प्रारंभ, मनपाच्या आरोग्य विभागाचा पुढाकार Vidya Niketan Junior College Vaccination

विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातून विद्यार्थांच्या कोरोना लसीकरणाला प्रारंभ,

मनपाच्या आरोग्य विभागाचा पुढाकार  

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर ,08 जानेवारी: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण होत आहे. ७ व ८जानेवारी रोजी नागपूर मार्गावरील विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय येथे थेट लसीकरण केंद्र सुरु करून विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. 
Corona, Vaccination, CMCChandrapur
Vidya Niketan Junior College
महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार मनपाच्या आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयस्तरावर 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस देणारे विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय हे पहिले लसीकरण केंद्र ठरले. 
यावेळी मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत, डॉ. अतुल चटकी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमामुळे कॉलेज कॅम्पसमध्ये लसीकरण यशस्वी झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष कुमार झा व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन दिले. श्री जैन सेवा समितीचे अध्यक्ष मा. राजकुमार पुगलिया व सर्व अधिकारी यांचे सहकार्य लाभले.