#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 23 फरवरी: नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव फाट्याजवळ कार, DNR ट्रॉव्हेल्स, छोटा कंटेनर याच्यात झालेल्या अपघातात 3 जण जख्मी झाले. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. ही घटना आज सकाळी 10 ते 11 वाजताच्या सुमारास घडली. अधिक तपास वरोरा पोलीस करत आहेत.
अधिक माहिती नुसार चंद्रपूर वरून कार क्रमांक MH-40-A-8505 ही नागपूरच्या दिशेने जात असताना महामार्गावरील वरोरा तालुक्यात येणाऱ्या पिंपळगाव फाट्या जवळ अचानक कार अनियंत्रित झाली व दुभाजक ओलांडून नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आली. त्याच वेळी छोटा कंटेनर नागपूर वरून चंद्रपूरच्या दिशेने जात असताना कारला वाचविण्यासाठी कंटेनर चालकाने ब्रेक मारले व महामार्गावररुन खाली उतरत गेला तरी ही कारला धडक बसून ती पलटी झाली. कंटेनर चालकाने ब्रेक मारल्याने त्यामागून येणाऱ्या ट्रॉव्हेल्स चालकाने ही अपघात टाळण्यासाठी ब्रेक मारल्याने ती सुद्धा अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला होऊन अपघातग्रस्त झाली. कार चालकाला वाचविताना घडलेल्या या अपघातात कार मधील 3 जण जख्मी झाले. सुदैवाने दुर्घटनेत जिवीतहानी झाली नाही.
पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जख्मींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जखमींवर उपचार करून त्यांना रेफर करण्यात आले असल्याचे कळते. जखमींमध्ये प्रियंका तोडासे, निशा कोरडे, सुनील गोवारदिपे यांचा समावेश आहे. अधिक तपास वरोरा पोलीस करीतआहे.
DNR Travels, Container, Car Accident Near Pimpalgaon Fateh on Chandrapur-Nagpur Highway