ना. नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन...,चंद्रपूर भाजपाचा इशारा, राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने व निषेध आंदोलन No. Resign Nawab Malik, otherwise intense agitation ... Chandrapur BJP's warning Protests and demonstrations against the state government

ना. नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन...

चंद्रपूर भाजपाचा इशारा

राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने व निषेध आंदोलन

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 24 फरवरी: मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लागत आहे.बुधवारी असाच एक आरोप अल्पसंख्यांक मंत्री श्री नवाब मलिक यांच्यावर इ.डि ने चौकशीअंती लावून ना.मलिक यांना अटक केली आहे. तरी त्यांना मंत्रीपदावर कायम ठेवून सरकार पाठराखण करीत आहे.याचा निषेध नोंदविण्यासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे आज गुरुवार(24 फेब्रुवारी)ला जटपूरा गेट चंद्रपूर येथे निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले. सरकारने ना.नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडेल. असा इशारा चंद्रपूर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष  डॉ मंगेश गुलवाडे यांनी दिला आहे.
विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जेष्ठ नेते प्रमोद कडू, तुषार सोम, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, कोषाध्यक्ष प्रकाश  धारणे, जिप अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, माजी आ.सुदर्शन निमकर, महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर, मंडळ प्रमुख रवी लोणकर, विठ्ठलराव डुकरे, सचिन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, दिनकर सोमलकर, संजय गजपुरे, नामदेव डाहूले, हनुमान काकडे, डॉ रामकुमार आकापेल्लीवार, अलका आत्राम, डॉ दीपक भट्टाचार्य, विजय वानखेडे, सुनील उरकुडे, अविनाश पाल, आशिष देवतळे, सुनील उरकुडे,हनुमान काकडे, अल्का आत्राम, अविनाश पाल, प्रभा गुडधे, रेणू घोडेस्वार, मंजुश्री कसंगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, माया मांदाळे, भारती दुधानी, पूनम गरडवा, सोपान वायकर, रवी आसवांनी, महेंद्र मंडलेचा, अरुण रहांगडाले, लीलावती रविदास, माया उईके, गनेश रासपायले, राजू घरोटे, शीतल आत्राम, पुष्पा उराडे, राजेश थुल, मोहम्मद जीलानी, दिवाकर पुद्दटवार, गणेश रामगुंडेवार, सतीश तायडे, संजय पटले, मोनिषा महातव, चंदन पाल, आकाश ठुसे, रामणारायन रविदास, आनंदराव मांदाळे, रुद्रनारायण तिवारी, लक्ष्मण कोडापे, राहुल पाल, प्रवीण उरकुडे, वैभव पिंपळशेंडे आदींची उपस्थिती होती.
डॉ गुलवाडे म्हणाले, ना. नवाब मलिक वरील आरोप गंभीर आहेत.इडिला एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले.9 ठिकाणी सर्च केल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. त्यातील एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांचे आहे. मंत्री नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली. ज्यांची मालकी आहे त्यांनी सांगितले की, त्यांना एकही पैसा मिळाला नाही. जेथे हसिना पारकर सौदा करीत होती, त्यांनी सुद्धा बयाण दिले आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? असा प्रश्न डॉ गुलवाडे यांनी आंदोलनात बोलतांना उपस्थित केला.
जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, ते अतिशय गंभीर आहे. कोट्यवधीच्या रकमेच्या या सौद्यातील 55 लाख रूपये हे हसिना पारकरला मिळाले.
कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशाप्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे. देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचे कारण काय? याचे उत्तर ना मलिक यांनी दिले पाहिजे. असेही डॉ गुलवाडे म्हणाले.

 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे बयाण ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहे.देशाच्या शत्रूला मदत करणार्‍यांची गय केली जाऊ नये. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आ देवेंद्र फडणवीस यांनी जितके पुरावे होते, ते सर्व संबंधित यंत्रणांना दिले होते.तरीही मंत्र्यांचा राजीनामा ठाकरे सरकार घेणार नसेल, तर राजकारणाचा स्तर खालावेल.देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात व पूर्ण सरकार त्यांच्या पाठिशी उभे राहते, याचा देशात संदेश चांगला जाणार नाही, म्हणून ना. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊन छत्रपतींच्या महाराष्ट्रात लोकशाही नांदते, हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे. अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

No.  Resign Nawab Malik, otherwise intense agitation ...
 Chandrapur BJP's warning.
 Protests and demonstrations against the state government.