बल्हारशाह येथून 11 एप्रिल पासून मुंबईसाठी थेट रेल्वे पिटलाईनमुळे शक्य
पिटलाईन मुळे भविष्यात कलकत्ता, मद्रास, बंगलोर, नवी दिल्ली साठी बल्हारशाह येथून थेट रेल्वे हे माझे स्वप्न - हंसराज अहीर
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 28 मार्च :पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे railway प्रवाशांच्या सोयीकरीता पूणे, मुंबई करीता थेट रेल्वे गाडी, अनेक गाड्यांचे चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर थांबे मंजूर केलेले आहेत. बल्हारशाह रेल्वे स्थानक येथे पिटलाईन त्यांनी मंजूर केली होती. सदर पिटलाईनचे काम आता पूर्ण झाले असून 11 एप्रिल पासून बल्हारशाह येथून मुंबई साठी mumbai आठवड्यातून तीन दिवस मुंबई साठी रेल्वे धावणार आहे. पिटलाईन चे कार्य हे अहीर यांच्या दुरदृष्टीचे व अथक परिश्रमाचे फलित आहे.
हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने या आधी पूणे व मुंबईसाठी काजिपेठ येथून ट्रेन train सुरु करण्यात आली आहे. बल्हारशाह येथे पिटलाईन झाल्याशिवाय बल्हारशाह येथून कोणत्याही भागात थेट ट्रेन सुरु करणे शक्य नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पिटलाईन मंजूर करुन घेतली आणि आता बल्हारशाह येथे पिटलाईन चे काम पूर्ण होत असल्याने बल्हारशाह येथून पूणे, मुंबई साठी गाड्या सुरु होत आहेतच सोबतच येत्या काळात कलकत्ता, मद्रास, बंगलोर, दिल्ली या मेट्रो शहरांना सरळ रेल्वे सुरु करणार असल्याचे अहीर यांनी म्हटले आहे.
पिटलाईनमुळे बल्हारशाह रेल्वे स्थानकास अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार असून देशातील महत्वपूर्ण रेल्वेस्थानकांपैकी एक रेल्वे स्थानक होणार असे माझे स्वप्न असल्याचेही अहीर म्हणाले.
11 एप्रिल पासून बल्हारशाह balharshah ते दादर रेल्वे सुरु होणार असून बल्हारशाह येथून सोमवार, बुधवार, शुक्रवार ला रात्री 09.30 वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 01.25 ला पोहचणार आहे. आणि दादर dadar येथून मंगळवार, गुरुवार, शनिवार ला रात्री 9.45 ला सुटेल व बल्हारशाह येथे दु. 01.30 पोहचणार आहे. बल्हारशाह येथून थेट रेल्वे सुरु होत असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pm narendra modi व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हंसराज अहीर यांनी आभार मानले आहे. रेल्वे सुविधेकरीता सदैव तत्पर असणारे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे चंद्रपूर व बल्हारशाह रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पधाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी आभार मानले व अभिनंदन केले.
Balharshah, direct train from Balharshah to Mumbai from 11th April