चंद्रपुर जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणूक प्रारुप प्रभाग रचना व नकाशाबाबत हरकती व सूचना आमंत्रित, 17 मार्चपर्यंत स्वीकारल्या जातील सूचना Objections and suggestions are invited regarding election plan ward composition and map of Municipal Council of Chandrapur district. Suggestions will be accepted till March 17.

चंद्रपुर जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणूक प्रारुप प्रभाग रचना व नकाशाबाबत हरकती व सूचना आमंत्रित

🔹 17 मार्चपर्यंत स्वीकारल्या जातील सूचना

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 9 मार्च : जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, चिमूर, मूल, राजुरा, घुग्घुस, व नागभीड या नगर परिषदांच्या आणि भिसी या नगर पंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास 7 मार्च रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार उपरोक्त नगर परिषदा व नगर पंचायतीमधील प्रारुप प्रभाग रचना व प्रभागदर्शक नकाशावर हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. 10 मार्च ते  17 मार्चपर्यंत संबंधित नगर परिषद / पंचायत कार्यालयात हरकती व सूचना सादर करता येतील. प्राप्त हरकती व सुचनांवर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे 22 मार्च पर्यंत सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी कळवले आहे.

Objections and suggestions are invited regarding election plan ward composition and map of Municipal Council of Chandrapur district. Suggestions will be accepted till March 17.