दाताळा येथे जागतीक महीला दिनानिमीत्त सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम संपन्न At Datala, on the occasion of International Women's Day, a program of honoring women was held

दाताळा येथे जागतीक महीला दिनानिमीत्त सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम संपन्न 

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 13 मार्च : दाताळा गावात पहील्यांदाच झाशीची राणी महीला ग्राम संघ तसेच महीला बचत गट दाताळा यांच्या पुढाकाराने जागतीक महीला दिनाचे औचीत्य साधुन सन्मान स्त्री कर्तुत्वाचा सत्कार सोहळा तसेच विविध कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

राजमाता जिजाऊ, शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. महीलांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा सुध्दा घेण्यात आल्या. गावातील उत्कृष्ठ काम करण्या-या महीलांचा सत्कार तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम झाशीची राणी महीला ग्राम संघ दाताळा येथील अध्यक्षा सौ.संगीता ठेंगणे, सिमा विरुटकर, प्रेरणा युज्ञुरवार, प्रिया सेलोकर, अश्विनी रामटेके, छाया राऊत, गंगा पांडे, सुरेखा क्षिरसागर, अनिता मोहुर्ले, माधुरी हिवरकर, अर्चना नांदुरकर, आशा वर्कर हिवरकर ताई, जवादे ताई यांच्या प्रमुख उपथितीत पार पाडला. 

कार्यक्रमाचे संचालन कल्याणी देवाळकर तर आभार प्रदर्शन कविता कुडे यांना केले. याप्रसंगी गावातील अनेक स्त्रीया तसेच महीला बचत गटांच्या महीला उपथित होत्या.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. संगीता ठेंगणे यांनी मार्गदर्शन करतांना महीलांच्या यशस्वी गाथांची माहीती देत यापुढेही महीलांना विविध क्षेत्रात सहभाग घेवुन महीलांनी पुरुषांबरोबरच समाजाचे नेतृत्व करावे व महीला सक्षमिकरणासाठी सर्वानी आपले योगदान देत युवती महीलांवर होणा-या अन्याया विरोधात एकजुटीने उभे राहावे असे आव्हाहन केले.
At Datala, on the occasion of International Women's Day, a program of honoring women was held. Chandrapur.