चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा आरोप
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 25 मार्च : चंद्रपुर शहराच्या chandrapur city मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद बागेच्या azad garden नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. महापालिका प्रशासनाने cmc chandrapur या बगीचाचा लोकार्पण सोहळा शनिवारी २६ मार्चला आयोजित केला आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री,खासदार, स्थानिक आमदार यांना स्थान देण्यात आलेले नाही. हा प्रकार म्हणजे राजशिष्टाचाराचा भंग आहे. त्यामुळे आयोजकांनी या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचानुसार लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात यावे. अन्यथा, हा कार्यक्रम होवू देणार नाही, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे. Congress
चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून एकमेव आझाद बगीचा आहे. या बगीचाची दुरवस्था झाल्यामुळे २०१६ मध्ये या बगीचाच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तब्बल सहा वर्षे नूतनीकरणाचे काम चालले. ३० एप्रिलला मनपाची मुदत संपणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर बगीचा लोकार्पणाचा सोहळा आटोपण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २६ मार्चला लोकार्पण सोहळा आयोजित केला. तब्बल सहा वर्षांनंतर बगीचा चंद्रपूरकरांसाठी उपलब्ध होणार आहे. ही आनंदाची बाब आहे. त्याला विरोध असण्याचे कोणतेही कारण नाही.
परंतु, लोकार्पण सोहळ्याला राजशिष्टाचारानुसार लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे गरजेचे आहे. परंतु, आयोजकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, स्थानिक आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकली नाही. आयोजक म्हणून मनपा प्रशासनाने केलेली चूक गंभीर आहे. त्यामुळे तातडीने ही चूक दुरुस्त करून राजशिष्टाचारानुसार पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, स्थानिक आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची नावे पत्रिकेत समाविष्ट करावी, अशीही मागणी तिवारी यांनी केली.