शिवसेना आमदार अडचणीत; प्रवर्तन निदेशालय (ED)कडून संपत्ती जप्त, शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता Shiv Sena MLAs in trouble; Enforcement Directorate (ED) Assets confiscated from Allegations between Shiv Sena and BJP are likely to intensify

शिवसेना आमदार अडचणीत; 

प्रवर्तन निदेशालय (ED)
कडून  संपत्ती जप्त

शिवसेना आणि भाजप  यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता

#Loktantrakiawaaz
मुंबई, 25 मार्च  : शिवसेना नेते प्रताप सरनाईक pratap sarnaik यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने enforcement directorate जप्त केली आहे. NSEL घोटाळा National Spot Exchange Limited scam प्रकरणात ईडीने (ED) ही कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग money landing प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना shivsena आणि भाजप bjp यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 

सन 2013 मध्ये एनएसईएल घोटाळा scamप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर (FIR) दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीने ताब्यात घेत चौकशी सुरू केली. एनएसईएल घोटाळा प्रकरणात संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचे समोर आले. जवळपास 13000 गुंतवणूकदारांच्या  5600 कोटींच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 

ईडीने केलेल्या तपासानुसार, आस्था ग्रुपकडे एनएसईएलची 242.66 कोटी थकबाकी रुपयांची थकबाकी होती. आस्था ग्रुपने सन 2012-13 या कालावधीत  21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टसाठी दिले. त्यापैकी 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली. कागदपत्रांची तपासणी, मिळालेली माहिती आदींच्या आधारे ईडीने (ED) ठाणे येथील दोन फ्लॅट आणि काही जमिनीचा काही भाग ईडीने जप्त केला आहे. ईडीने जप्त केलेल्या रक्कमेची किंमत ही 11.35 कोटी रुपये असून पीएमएलए कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

Shiv Sena MLAs in trouble.
Enforcement Directorate (ED)
Assets confiscated from
Allegations between Shiv Sena and BJP are likely to intensify.