प्रमोद खिरटकर व वर्धन चवरे यांना मित्र परिवारांकडून निरोप समारंभ Farewell ceremony to Pramod Khiratkar and Vardhan Chavre from friends and family

प्रमोद खिरटकर व वर्धन चवरे  यांना मित्र परिवारांकडून निरोप समारंभ

चंद्रपूर दि 15 मार्च: प्रमोद खिरटकर व वधॅन चवरे हे वयोमर्यादा नुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले प्रमोद खिरटकर हे जलसंपदा विभागाअंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण  विभाग चंद्रपूर येथे उपकार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते 26 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले तसेच वर्धन चवरे  हे (सिटीपीएस) दुर्गापुर येथून 28 वर्षे सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले त्यांना नुकताच मित्र परिवाराकडून निरोप देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  महानगरपालिकाचे शहर अभियंता   महेश बारई हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उप अभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर, रवींद्र जुमडे, मनोहर बेले, राजू पिंदुरकर, सुनील बोरीकर, मित्र परिवार उपस्थित होते. महेश बारई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रमोद खिरटकर व वर्धन चवरे अत्यंत मनमिळावू व अधिकाऱ्यांनी कोणतेही काम सांगितले असता अत्यंत संयमाने व उत्साहाने जबाबदारी पार पाडत असे व मित्रपरिवार मध्ये ते कोणतेही काम असो ते धावून यायचे व मदत करायचे, त्यांच्या सत्कार महेश बारई  व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उप अभियंता विजय बोरीकर, अनिल घुमडे, रवींद्र हजारे , शाखा अभियंता, रवींद्र जोगी, डॉ. किशोर जेनेकर, आनंद टेकाम, इक्बाल भाई, मनोहर बेले यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला श्री प्रमोद खिरटकर व वर्धन चवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शासकीय सेवेतून निवृत्त होताना दुःख होते तसेच आनंदही  होतो. शासकीय सेवा म्हटले की वयोमर्यादेची अट आहे त्याला पर्याय नाही सर्व मित्र परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देऊन पुढील आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो अशी 
शुभेच्छा व्यक्त करून निरोप देण्यात आला कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक रविंद्र जूमडे यांनी केले. यावेळी मिञ परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Farewell ceremony to Pramod Khiratkar and Vardhan Chavre from friends and family.