व्‍यसनमुक्‍तीचा मार्ग हा परमेश्‍वराकडे नेणारा –आ. सुधीर मुनगंटीवार, भव्‍य दारु व्‍यसनमुक्‍ती महामेळावा मोरवा येथे संपन्‍न The path to de-addiction is the one that leads to God. MLA Sudhir Mungantiwar Bhavya Daru Vyasanmukti Mahamelava held at Morwa

व्‍यसनमुक्‍तीचा मार्ग हा परमेश्‍वराकडे नेणारा –आ. सुधीर मुनगंटीवार

भव्‍य दारु व्‍यसनमुक्‍ती महामेळावा मोरवा येथे संपन्‍न

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: समाजामध्‍ये चांगले काम करणारे लोक कमी व वाईट काम करणारे लोक जास्‍त आहेत. अशावेळी संत संतोष महाराजांसारखे लोक सर्व सामान्‍यांना व्‍यसनमुक्‍तीसाठी प्रेरित करतात ही अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब आहे. व्‍यसनमुक्‍तीचा मार्ग हा प्रत्‍येक व्‍यक्‍तीच्‍या व्‍यक्‍तीगत उन्‍नतीचा व त्‍या योगे परमेश्‍वराकडे नेणारा आहे असे प्रतिपादन लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. प.पु. शेषराव महाराज व्‍यसनमुक्‍ती संघटना यांच्‍य सौजन्‍याने आयोजित भव्‍य दारु व्‍यसनमुक्‍ती महामेळावा प्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवारांनी वरील भावना व्‍यक्‍त केल्‍या.
खरे तर एखाद्या व्‍यक्‍तीला एखाद्या गोष्‍टीचे व्‍यसन लागल्‍यावर ते सुटणे अतिशय कठीण असते. अशा वेळी त्‍याचे मनोबल वाढविण्‍याची गरज असते. हेच काम प.पु. शेषराव महाराजांचे उत्‍तराधिकारी संतोष महाराज अतिशय प्रेमळपणे व नेटाने करीत आहेत ही चांगली गोष्‍ट आहे असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. मी एकटा काय करेन हा विचार न करता मी स्‍वतः व्‍यसनमुक्‍त कसा होईल व इतरांना त्‍या मार्गाला कसे लावेल असा विचार प्रत्‍येकाने करावा असे प्रतिपादन आ. मुनगंटीवार यांनी केले. दारु पिऊन तब्‍येत चांगली राहते असे सांगणारा एकही जण मला अजुन भेटला नाही. तसेच रस्‍त्‍यावरील ८० टक्‍के अपघात हे दारु पिल्‍याने होतात. हे अवहालांमधून सिध्‍द झाले आहे, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. व्‍यसन करायचेच असेल तर आपल्‍या कुटूंबावर प्रेम करा व ग्रामगीतेवर प्रेम करा.
याप्रसंगी अशा माजी सैनिकांचा सत्‍कार करण्‍यात आला ज्‍यांनी देशासाठी आपली सेवा दिली. अशा सैनिकांचे योगदान देशासाठी अतुलनिय आहे असे उदगार आ. मुनगंटीवार त्‍यांच्‍या सत्‍कार प्रसंगी काढले. या प्रसंगी मंचावर संतोषजी महाराज, माजी आ. वामनराव चटप, भाजपा ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, चंदू पाटील मारकवार, नामदेव डाहुले, शोभाताई पिदुरकर, विवेक बोढे, भाऊराव ठाकरे, महेश कोंडावार, राकेश गौरकार, स्‍नेहाताई साव, सेवा निवृत्‍त सैनिक मनोज ठेंगणे, महादेव मोहुर्ले, विलास टोंगे उपस्थित होते. कार्यक्रमात माजी आ. वामनराव चटप, देवराव भोंगळे, चंदू पाटील मारकवार यांनी मार्गदर्शन केले. संतोषजी महाराज यांनी आशिर्वाद पर संबोधित केले.   

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजक अनिल डोंगरे, लक्ष्‍मीकांत धानोरकर, पंडित काळे, दिगांबर वासेकर, अविनाश राऊत, सुरेश जिभकाटे, भालचंद्र रोहनकर, प्रकाश अगमकर, अरुण बावणे, नारायण खापने, वंदना वरभे, आकाश क्षिरसागर, बापुराव मुंगोले, श्रीकृष्‍ण पिंपळकर, देविदास कौरासे, उत्‍तम लडके, दिवाकर कोहपरे, अरविंद धानोरकर, कालिदास पाल, पुणेश पिंपळशेंडे, बंडू निब्रड, महादेव पिदुरकर, भगवती पिदुरकर, हरिदास कौरासे, समिर देशकर, धिरज घोगुल, ईश्‍वर बोरसरे, सुर्यभान जुनारकर यांनी अथक परिश्रम केले. या प्रसंगी माजी सैनिकांचा सत्‍कार करण्‍यात आला व संतोषजी महाराज यांनी उपस्थित सर्वांना व्‍यसनमुक्‍तीची शपथ दिली.

The path to de-addiction is the one that leads to God. MLA Sudhir Mungantiwar.
Bhavya Daru Vyasanmukti Mahamelava held at Morwa.