प्रस्तावित नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानांतरण करून चंद्रपूर जिल्ह्यात उभारा.... Transfer the proposed Nanar oil refining project and set it up in Chandrapur district ....

प्रस्तावित नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानांतरण करून चंद्रपूर जिल्ह्यात उभारा.... 

केंद्र शासनातर्फे प्रस्तावित असलेला नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे पुर्णत्वास येण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे सदर प्रकल्प चंद्रपूर येथे स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन केली . विदर्भातील चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून महारत्न कंपन्यांचे अनेक मोठे प्रकल्प. तसेच राज्यातील सर्वात मोठे वीज प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्याकरिता चंद्रपूर जिल्हात या उद्योगवाढीस पोषक वातावरण आहे.  या प्रकल्पाच्या निर्मितीकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा देखील चंद्रपूरात उपलब्ध आहे. हा प्रकल्प चंद्रपुरात उभारावा हि इच्छा चंद्रपूर करांची देखील आहे.

Transfer the proposed Nanar oil refining project and set it up in Chandrapur district ....