सुमारे २०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक Two arrested in GST scam worth around Rs 200 crore

सुमारे २०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक 

#Loktantrakiawaaz
मुंबई, 19 मार्च : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणा -या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने maharashtra घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. टेस्को इम्पेक्स आणि मे. पारसमणी ट्रेडर्स या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती. तपासणीदरम्यान असे लक्षात आले की करदाते मे. टेस्को इम्पेक्सचे मालक श्री. प्रमोद कातरनवरे आणि मे. पारसमणी ट्रेडर्सचे मालक श्री गणेश काकड हे कोणताही व्यावसाय करीत नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या पुरवठ्याशिवाय १९७ कोटी रुपयांची बनावट बीजके Fraud Bill देऊन आणि २९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर gst त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरीत करून २९ कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बिजक किंवा बिले जारी करुन शासनाची महसूल हानी केली आहे. अन्वेषणा दरम्यान या दोन्ही प्रकरणांमध्ये श्री. हिरालाल जैन हे कर्ताधर्ता असून श्री. प्रमोद कातरनवरे हे ही महसूल हानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्री. हिरालाल जैन व श्री. प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी साठी दिनांक १६/०३/२०२२ रोजी अटक केली आहे. या व्यक्तींचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार तुरूंगवासास पात्र आहे. या दोन्ही व्यक्तींना मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकरी यांच्या न्यायालयाने दि. २८/०३/२०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणात अन्वेषण अधिकारी श्री. श्रीकांत पवार, सहाय्यक राज्यकर आयुक्त हे श्री. प्रविण कुलकर्णी, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. सदर तपासासाठी मा. श्री अनिल भंडारी ( भा.प्र.से ) , सहआयुक्त अन्वेषण - क यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर कार्यवाहीसाठी श्री सुजित पाटील, श्री प्रशांत खराडे, श्री विदयाधर जगताप, श्री  सुमेधकुमार गायकवाड, श्री  रंजित हातोले आणि श्रीमती लीनता चव्हाण, सर्व सहाय्यक राज्यकर आयुक्त यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. सलग दोन महिन्यांच्या अटक कार्यवाहीतुन महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.
Two arrested in GST scam worth around Rs 200 crore.maharashtra