केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दुर्मिळ प्रजातीचे नेते : माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार Union Minister Nitin Gadkari is a leader of rare species: Former Finance Minister, MLA Sudhir Mungantiwar

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दुर्मिळ प्रजातीचे नेते : माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार

#Loktantrakiawaaz
मुंबई, 20 मार्च : सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांचा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. सीएसआर csr journal award जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 देऊन मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईत (mumbai) हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी गडकरींची तोंडभरून स्तुती केली. नितीन गडकरी हे दुर्मिळ प्रजातीचे नेते आहेत.राजनीती नाही तर समाजनीतीच राजकारण ते करतात. त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला हे सौभाग्य आहे, असं उद्गार सुधीर मुनगंटीवार यांनी काढलं. पुरस्कारावर विश्वास नव्हता. पण आपलं काम पोहोचलं पाहिजे. म्हणून यावेळी इथे आलो असं सांगत मुनगंटीवार यांनी यावेळी सीएसआर कंपन्यांचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ आणि वन खातं होतं. यावेळी त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली होती. विशेष म्हणजे त्यांनी वृक्षरोपणाचा धडका लावला होता. तसेच वृक्षरोपण करणाऱ्या संस्था, संघटनांनाही प्रोत्साहित करण्याचं काम केलं होतं. त्याचीच दखल घेऊन मुनगंटीवार यांना सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 देऊन गौरवण्यात आलं. 
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
Union Minister Nitin Gadkari is a leader of rare species: Maharashtra Former Finance Minister, MLA Sudhir Mungantiwar