हनुमान जयंतीनिमित्त आम्ही 1000 लाऊडस्पीकर आम्ही पूर्ण देशभर हे मंदिरांना देणार : मोहित कंबोज भाजप नेते On the occasion of Hanuman Jayanti, we will provide 1000 loudspeakers to temples all over the country: Mohit Kamboj BJP leader

हनुमान जयंतीनिमित्त आम्ही 1000 लाऊडस्पीकर आम्ही पूर्ण देशभर हे मंदिरांना देणार : मोहित कंबोज भाजप नेते 

मुंबई: उद्या हनुमान जयंतीनिमित्त आम्ही 1000 लाऊडस्पीकर आम्ही पूर्ण देशभर हे मंदिरांना देणार आहोत.. आणि जे काही ॲप्लिकेशन्स आम्हाला येणार आहेत ते आम्ही व्हेरिफाय करून त्यांना सुद्धा आम्ही लाऊड स्पीकर देणार आहोत..
मंदिर आणि मशिदी मध्ये फरक आहे मंदिरापेक्षा जास्त लाऊड स्पीकर हे मशिदीवर ती लावले गेलेले आहेत..

सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावून हे लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत हे लाऊड स्पीकर काढण्याची मागणी राज साहेब ठाकरे तसेच आम्ही सुद्धा केलेली आहे.. 

भोंग्याच्या आवाजाची तीव्रता घटवण्यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत या संदर्भात आज मीरा रोड मधील एका काँग्रेस नेत्याने स्वतःच्या मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी केलेला आहे याच मी स्वागत करत आहोत..

कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला त्याची प्रार्थना करण्याचा स्वातंत्र्य आहे आणि आम्ही त्या प्रार्थनेच्या विरोधात नाही आहोत.. 

सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून मशिदी वरती एक किलोमीटरच्या अंतरावरती हे भोंगे लावण्यात आलेले आहेत त्या भोंग्यांवर आमचा आक्षेप आहे या सगळ्या मुद्द्यावर जनाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गप्प का आहेत?  शिवसेना गप्प का आहे? माननीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 साली महाआरती ची घोषणा केली होती याच्या तुम्ही सोबत आहात की सत्तेच्या लाचारीसाठी या महाआरतीच्या तुम्ही विरोधात जाणार आहात... 

हा मुद्दा काही आमच्यासाठी राजकीय नाही हा मुद्दा आमच्यासाठी धार्मिक आणि सामाजिक आहे..

On the occasion of Hanuman Jayanti, we will provide 1000 loudspeakers to temples all over the country: Mohit Kamboj BJP leader