राज्यपालांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यातील 4 स्काऊट गाईडला पुरस्कार Governor awards 4 scout guides in Chandrapur district

राज्यपालांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यातील 4 स्काऊट गाईडला पुरस्कार

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : महाराष्ट्र राज्य, भारत स्काऊट आणि गाईड, मुंबई यांच्यावतीने सन 2018-19 व 2019-20 या दोन वर्षात राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. दि.26 एप्रिल 2022 रोजी स्काऊट गाईड पवेलियन, शिवाजी पार्क, दादर (प.) मुंबई येथे हा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य, भारत स्काऊट आणि गाईडचे अध्यक्ष सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याचे मुख्य आयुक्त तथा क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यातून राज्य पुरस्कार उत्तीर्ण झालेल्या स्काऊट गाईडपैकी प्रतिनिधी स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यातून 2 स्काऊट 2 गाईड उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने उत्तीर्ण स्काऊट 25-18, गाईड 28-28 अशी एकूण 43 स्काउट व 56 गाईड यांचे नेतृत्व सावली, रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे स्काऊट दिशांत गुप्तराज ढेंगळे, जि. प. हायस्कूल चेकनिंबाळा येथील सम्यक सत्यविजय वाघमारे, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, घुगुस येथील गाईड अश्लेषा विभिषण फुसाटे तर भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथील हर्षा दत्तात्रय रायपुरे तसेच स्काऊट गाईड यांचे नेतृत्व भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, चंद्रपूरच्या गाईड कॅप्टन तथा कॉन्टीजन लीडर रंजना किन्नाके यांनी केले.

सर्व स्काऊट गाईड यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील स्काऊट गाईड यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. पुरस्कार प्राप्त सर्व स्काऊट गाईड यांचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेन्द्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण तसेच चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयातील जिल्हा संघटक दीपा मडावी, नीता आगलावे, अर्पित कडू, अरुणा ठाकरे, वसंत विहीरघरे यांनी अभिनंदन केले आहे.

Governor awards 4 scout guides in Chandrapur district.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.