चंद्रपूरातील माता श्री कन्‍यका परमेश्‍वरी देवस्‍थान विश्‍वस्‍तांची निवड, अध्‍यक्ष पदी मिलिंद कोतपल्‍लीवार तर उपाध्‍यक्ष पदी संदिप पोशट्टीवार Chandrapurateel Mata Shri Kanyaka Parameshwari Devasthan Vishwastanchi Nivad President's post Milind Kotpalliwar and Vice-President's post Sandeep Poshttiwar

चंद्रपूरातील माता श्री कन्‍यका परमेश्‍वरी देवस्‍थान विश्‍वस्‍तांची निवड

अध्‍यक्ष पदी मिलिंद कोतपल्‍लीवार तर उपाध्‍यक्ष पदी संदिप पोशट्टीवार

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: चंद्रपूर शहराच्‍या मध्‍यभागी वसलेल्‍या माता श्री कन्‍यका परमेश्‍वरी देवस्‍थान ट्रस्‍ट चंद्रपूर विश्‍वस्‍तांची सर्वानुमत्‍ते निवड करण्‍यात आली. ही निवड पुढील २०२२ ते २०२७ या पाच वर्षाकरीता असेल.

दिनांक २ एप्रिल २०२२ ला झालेल्‍या बैठकीमध्‍ये अध्‍यक्ष पदी मिलिंद कोतपल्‍लीवार, उपाध्‍यक्ष पदी संदिप पोशट्टीवार, सचिव पदी राजेश्‍वर चिंतावार, सहसचिव पदी प्रशांत कोलप्‍याकवार, कोषाध्‍यक्ष पदी अजय मामीडवार, सदस्‍य उदय बुध्‍दावार  व राजेश्‍वर सूरावार यांची निवड झाली आहे.

अंहिसा आणि त्‍यागाची मुर्ती असलेल्‍या व स्‍त्रीयांचे संरक्षण करण्‍याकरीता माता श्री कन्‍यका परमेश्‍वरी यांचा आशीर्वाद सदैव जनसमुहाला राहीलेला आहे. त्‍यांच्‍याच कृपेने जनकल्‍याण घडून येते आहे. श्री माता कन्‍यका परमेश्‍वर यांची सेवा करण्‍याची संधी विश्‍वस्‍त मंडळा मिळाली याचा आनंद विश्‍वस्‍त मंडळाने व्‍यक्‍त केला आहे.  या विश्‍वस्‍त मंडळाला विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्‍छा दिल्‍या असुन समाजातील ज्‍येष्‍ठ नागरिकांनी अभिनंदन केलेले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिलेल्‍या आहे.

Chandrapurateel Mata Shri Kanyaka Parameshwari Devasthan Vishwastanchi Nivad.
President's post Milind Kotpalliwar and Vice-President's post Sandeep Poshttiwar.