काँग्रेसचे महागाई चालिसा आंदोलन, केंद्र सरकार विरोधात पेट्रोल पंप समोर घोषणाबाजी, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ठिकठिकाणी आयोजन congress mahagai chalisa andolan

काँग्रेसचे महागाई चालिसा आंदोलन

केंद्र सरकार विरोधात पेट्रोल पंपसमोर घोषणाबाजी

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ठिकठिकाणी आयोजन

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : देशातील महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी झोपेचे सोंग घेऊन असलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी, २२ एप्रिलला महागाई चालिसा आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शहरातील कोतपल्लीवार पेट्रोल पंपसमोर दुपारी ४ वाजता, तर कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँकेसमोरील पेट्रोल पंपावर सायंकाळी ५ वाजता आंदोलन पार पडले. यावेळी महागाई कमी करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी यावी, यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने हनुमान चालिसेचेही वाचन करण्यात आले. 

देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूसोबतच खाद्यतेलच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. परंतु, केंद्र सरकारचे महागाई कमी करण्याकडे कोणतेही लक्ष नाही. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे. देशातील काही राज्यांत मागील महिन्यांत झालेल्या निवडणुकांमुळे इंधनावरची दरवाढ रोखून ठेवण्यात आली होती. परंतु, निवडणुका आटोपताच केंद्र सरकारने इंधन दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा करण्याचे काम सुरू केले आहे.

त्यामुळे केंद्रसरकारचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी महागाई, इंधन दरवाढीसंदर्भातील दिलेली भाषणे यावेळी मोठ्या स्क्रीनवरून नागरिकांना दाखविण्यात आली. त्यानंतर रितेश (रामू) तिवारी यांनी, देशात महागाई वाढीला केंद्र सरकारची चुकीची धोरणे जबाबदार आहेत. महागाई वाढीने सर्वांत मोठा आर्थिक फटका सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारविरोधात सर्व जनतेत रोष व्यक्त होत असून, त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी धार्मिक विषय समोर केले जात असल्याचा आरोप केला.
यावेळी काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आपल्या मार्गदर्शनात केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. तसेच पथनाट्यातून महागाईविरोधात जनजागृती करण्यात आली. पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, ज्येष्ठ कामगार नेते के. के. सिंग यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक कॉंग्रेस, महिला काँग्रेस, ओबीसी विभाग, अनुसूचित जाती विभाग, इंटक काँग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, सेवादल, किसान सेल, उत्तर भारतीय सेल यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
congress mahagai chalisa andolan

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.