महाराष्ट्रात लोडशेडिंग कायम राहणार - ऊर्जामंत्री नितीन राऊत, जिकडे वसुली कमी, चो-या जास्त तिथे लोडशेडिंग केलं जाणार Load shedding will continue in Maharashtra - Energy Minister Nitin Raut

महाराष्ट्रात लोडशेडिंग कायम राहणार - ऊर्जामंत्री नितीन राऊत 

जिकडे वसुली कमी, चो-या जास्त तिथे लोडशेडिंग केलं जाणार 

#Loktantrakiawaaz
मुंबई, 21 अप्रैल : महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात लोडशेडिंग (load shedding in maharashtra) कायम राहणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत nitn raut यांनीच हे स्पष्ट केलं आहे. नितीन राऊत आणि मुख्यमंत्र्यांची लोडशेडिंगसंदर्भात बैठक झाली. लोडशेडिंगचं खापर ऊर्जामंत्र्यांनी केंद्र सरकारवर फोडलं आहे. 

जिकडे वसुली कमी, चो-या जास्त तिथे लोडशेडिंग केलं जाणार असल्याचं देखील ऊर्जामंत्र्यांनी म्हटलं आहे.

मंत्री राऊत (Nitin Raut) यांनी म्हटलं की, 'देशात विजेची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोड शेडिंग 9 मोठ्या राज्यात होतं आहे. महाराष्ट्र त्यापैकी 1 आहे. कोविड संपल्याचा परिणामही विजेची मागणी वाढण्यावर झालेली आहे. कोळसा मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाकडे बोट दाखवलं आहे.'
वीज तुटवड्याची (Power outage) स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज येथे दिले. याशिवाय महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी यासाठी खासगी वीज कंपन्या तसेच अन्य पर्यायी मार्गांबाबतचे काटेकोर नियोजन करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. खासगी वीज कंपन्यांना अतिरिक्त वीज निर्मिती (Power Generation) करावी. त्यासाठीच्या लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वीज बचतीबाबत ग्रामपंचायत, नगरपालिका ते महापालिकास्तरांपर्यंत जागरूकता निर्माण होण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. वर्षा येथील समिती सभागृहात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वीजनिर्मितीच्या नियोजनाबाबत आज उर्जा विभागाची बैठक झाली.

या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

Load shedding will continue in Maharashtra - Energy Minister Nitin Raut.

The lower the recovery, the higher the load shedding.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.