भद्रावती येथील मुंडके कापून हत्या केलेल्या महिलेची स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी ओळख पटवून गुन्हयाचा केला पर्दाफाश, अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून Local crime branch and cyber cell have identified the woman who was beheaded in Bhadravati. Maitrini kills Maitrini to avenge insult

भद्रावती येथील मुंडके कापून हत्या केलेल्या महिलेची स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी ओळख पटवून गुन्हयाचा केला पर्दाफाश

अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून

चंद्रपुर (भद्रावती ): 04 एप्रिल 2022 रोजी पहाटे दरम्यान पोलीस स्टेशन भद्रावती हदद्दीत भद्रावती ते तेलवासा रोड मायक्रॉन शाळे मागील पडीत शेत शिवारात अंदाजे 20 ते 22 वर्षीय युवती मुंडके कापून निर्घुण हत्या करून निर्वस्त्र स्थितीत मिळून  (young girl body) आली होतीतिचे शरीराला मुंडके (शिर) नव्हते. कोणीतरीअज्ञात इसमाने सदर युवतीच्या खुन करूनतिची ओळख पटु नये म्हणून तिचे मुंडके शरीरापासुन वेगळे करून तिचे मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत ठेवले. यावरून पोलीस स्टेशन मद्रावती येथे अज्ञात इसमांविरूद्ध कलम 302, 201 मा. दं.वि.चा गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर घटनास्थळी मा.पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ भेट देवून मृतदेहाचे व परिसराची पाहणी केली. मृतदेह निर्जनस्थळी मुंडके नसलेल्या नग्न अवस्थेत होता. आरोपीने मयताची ओळख पटू नये म्हणून तिचा शिर कापून नेले तसेचे कपडे सुद्धा काढून घेवून गेला अशा अवस्थेत कोणत्याही प्रकारचे पुरावा, खुना, निशानी नसल्यामुळे सदर मृत महीलेची ओळख पटविणे पोलीसांना आव्हाण होते.
सायबर सेल मधील सायबर एक्सपर्ट यांचे मार्फतीने मृत महिलेच्याशरीरावरील खुना मृत देहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तू ईत्यादी शोध पत्रीका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व बाजुच्या सर्व जिल्हयातून या वयाच्या हरविलेल्या / पळून गेलेल्या मुलींची शहानिशा केली. परंतू उपयुक्त माहिती मिळून आली नाही. घटना घडून काहि दिवस होवून हरविलेल्या तक्रार प्राप्त झाली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रीक तपास केला तसेच गोपनिय माहिती मिळविण्याचा अहोरात्र प्रयत्न केला. त्यामध्ये पोलीसांना यश आले. गोपनिय माहितीदाराकडून सदर महिलेची ओळख पटविण्यात आली. तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. त्यावरून तिच्या राहत्या घराचा रामटेक जि.नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला त्यावरून तिची मोठी बहीन हिचेशी संम्पर्क साधून ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. तिचे बहीनीने तिच्या शरीरा वरील व्रण व वापरीतील वस्तू पाहून मृतक महिला हि तिची बहीन असल्याचे खात्री केली.

सदर खुनातील आरोपी शोधण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. जितेंद्र बोबडे, स.पो. नि.संदीप कापडे, पो.उपनि. अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेतील 20 अंमलदार यांचे तिन वेगवेगळे पथके तयार केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तसेच सायबर सेल यांचे मदतीने तपास कार्य चालू केले. स्थानिक गुन्हे शाखेतील (Crime Branch) सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सायबर सेल चंद्रपूर (Chandrapur Cyber Cell) यांनी गुन्हयाचा तांत्रीक तपास केला. सदर तांत्रीक तपासाचे आधारे सदर गुन्हयातील मुख्य सुत्रधार एक महिला विधीसंघर्षग्रस्त बालक विचारपूस करुन ताब्यात घेण्यात आले.

सदर ताब्यात घेतलेल्या विधी संघर्षग्रस्त बालक हिचेकडे सदर गुन्हयाबाबत केलेल्या चौकशी मध्ये माहिती प्राप्त झाली आहे की. यातील मयत मुलगी व ती मैत्रीणी होत्या एकाच रूम मध्ये राहत होत्या काही महिण्यापासून वेगवेगळ्या करणामुळे आपसामध्ये भांडण होत होते. मयत मुलगी तिचा ईतर मित्रांसमोर अपमान करीत होती. त्यामुळे तिचे मनात मयत मुली बद्दल रोष निर्माण होवून तिला अद्दल घडवायची असा तिने निश्चय केला. तिने तिचे पाहीजे आरोपी  मित्राला हि गोष्ट सांगीतली दोघांनी एकत्रीत मयताला जिवे ठार मारण्याचे (plan to kill friend) उद्देशाने कट रचला. त्याप्रमाणे मयताला ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने दिनांक 03/04/2022 रोजी रात्री 08:45वा. वरोरा नाका येथे बोलवून घेतले. त्या ठिकाणावरून तिने व पाहीजे आरोपीने तिला मोटार सायकलवर बसवून घटनास्थळी घेवून गेले. रात्री 12:00 वा. सुमारास घटनास्थळी निर्जनस्थळी नेवून विधीसंघर्षग्रस्त बालकाने मयताला मारहाण करून जमीनीवर खाली पाडले नंतर तिचे पाय पकडून मांडीवर चाकूने दोन वार केले.. सदर वेळी पाहीजे आरोपी मयताचे पोटावर बसून प्रथम गळा दाबून खून केला. नंतर तिची ओळख पटू नये म्हणून दोघांनीही दोघांच्याही चाकूने आळी पाळीने मयताचा गळा कापला तसेच मयताचे पुर्ण कपडे व मुंडके घेवून मोटर सायकलवरून पसार झाले.
अजूनही आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. फक्त मृतक युवतीच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा करण्यापूर्वी पत्रकार परिषद का घेतली? हे सुद्धा रहस्यच आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स.पो.नि. जितेंद्र बोबडे, स.पो.नि. संदीप कापडे, पो. उपनि अतुल कावळे, स.फौ. राजेंद्र खनके, नाईम खान संजय आतकुलवार, सतिश बागमारे.. गणेश भोयर, अनुप डांगे, मिलींद जांभुळे, संदीप मुळे, प्रशांत नागोसे तसेच सायबर सेलचे मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंन्दे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे, उमेश रोडे नितेश महात्मे यांनी केली.

Chandrapur
Local crime branch and cyber cell have identified the woman who was beheaded in Bhadravati.
Maitrini kills Maitrini to avenge insult.