खासदारांनी पदाच्या अहंकाराऐवजी गरीमा जोपासावी - हंसराज अहीर MPs should cultivate dignity instead of ego - Hansraj Ahir

खासदारांनी पदाच्या अहंकाराऐवजी गरीमा जोपासावी - हंसराज अहीर

चंद्रपूर, 20 अप्रैल: चंद्रपुर जिल्ह्याच्या खासदारांनी भद्रावती येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाशी गैरवर्तणूक केल्याने पोलिसांनी त्यांचेवर गुन्ह्याची नोंद केल्याचे कळते. सदर प्रकार हा लोकशाही मुल्यांना पायदळी तुडविणारा आहे. एका कनिष्ठ कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधकडून हल्ला, शिविगाळ व धमकीसारखा प्रकार निषेधार्ह असून निंदास्पद आहे असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  लोकप्रतिनिधीकडून अशाप्रकारच्या वर्तणूकीची अजिबात अपेक्षा नाही. पदाच्या अहंकाराऐवजी पदाची गरीमा जोपासावी तसेच सार्वजनिक कार्यातून हेे दाखविण्याऐवजी एका कनिष्ठ कर्मचाऱ्यास धमकी देण्यात स्वारस्यमानणाऱ्या वृत्तीचा सर्व स्तरीय निषेध होणे गरजेचे असल्याचेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

MPs should cultivate dignity instead of ego - Hansraj Ahir