चंद्रपूर जिल्‍हयातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्‍या उत्‍थानासाठी पतंजली योगपीठने पुढाकार घ्‍यावा, हरीद्वार येथे आचार्य बाळकृष्ण यांची घेतली भेट Patanjali Yogpeeth should take initiative for the upliftment of farmers and tribals in Chandrapur district. Visit of Acharya Balkrishna at Haridwar

चंद्रपूर जिल्‍हयातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्‍या उत्‍थानासाठी पतंजली योगपीठने पुढाकार घ्‍यावा 

हरीद्वार येथे आचार्य बाळकृष्ण यांची घेतली भेट

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: चंद्रपूर जिल्‍हयातील शेतकरी तसेच आदिवासी बांधवांनच्‍या उत्‍थानासाठी पतंजली योगपिठ हरीद्वार यांनी पुढाकार घ्‍यावा व चंद्रपूर जिल्‍हयात विविध उपक्रम राबवावे, अशी विनंती आज  हरिद्वार  येथे आचार्य बाळकृष्‍ण यांना केली.
आज दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी हरीद्वार येथे पतंजली योगपीठ ट्रस्‍टचे महासचिव आचार्य बाळकृष्‍ण यांची भेट घेतली. यावेळी वरील विषयाच्‍या अनुषंगाने चर्चा करताना चंद्रपूर जिल्‍हयातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्‍या आयुष्‍यात समृध्‍दी व संपन्‍नता निर्माण व्‍हावी यादृष्‍टीने पंतजली योगपीठ ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन उपक्रम राबविले गेल्‍यास त्‍यांचे जीवनमान उंचावेल तसेच आर्थिक प्रगती देखील होईल. या प्रक्रियेत पंतजली योगपिठ ट्रस्‍टला आम्‍ही सर्वतोपरि सहकार्य करू असेही आश्वासन यावेळी दिले.
या विषयासंदर्भात निश्‍चीतपणे योग्‍य विचार करण्‍यात येईल, पंतजली योगपीठ ट्रस्‍टची चमू लवकरच चंद्रपूर जिल्‍हयाला भेट देईल व याबाबत सकारात्‍मक पाऊले उचलली जातील असे आश्‍वासन आचार्य बाळकृष्‍ण यांनी दिले.

Patanjali Yogpeeth should take initiative for the upliftment of farmers and tribals in Chandrapur district.

Visit of Acharya Balkrishna at Haridwar.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.