चंद्रपुर: भारतीय संस्कृती व एकतेचे प्रतिक असणारी प्रभू श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे भव्य-दिव्या स्वरूपात १० एप्रिल २०२२ ला रोज रविवार ला दुपारी ४.०० वाजता श्री काळाराम मंदिर, समाधी वार्ड येथून मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत निघणार असल्याचे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या सभेत ठरविण्यात आले. स्वामीनारायन मंदिरात दि.५ एप्रिल ला संपन्न झालेल्या सभेत अध्यक्षस्थानी रोडमल गहलोत, (जिल्हाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद) हे होते. या सर्व बैठकीला पुजनीय मनीषजी महाराज यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत, विनोद उपाध्याय, घनश्याम दरबार, वसंत थोटे, हरीशचंद्र अहिर, योगेश भंडारी, शैलेश बागला, मधुसुधन रुंगठा, दिनेश बजाज, हसमुखभाई ठक्कर, राजगोपल तोष्णीवाल, ब्रीजगोपाल मंत्री यांच्या उपस्थितीत शोभायात्राचा आढावा घेण्यात आला. शहरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे संचालन करण्याचे नियोजन करण्यात आले. शोभायात्रा हि धर्ममय, भक्तीमय, भव्यदिव्य आणि शिस्तबद्ध व्हावी. यात सर्वांचा सहभाग उत्स्फूर्त पणे व्हावा यावर योजना आखण्यात आली. या शोभायात्रा मध्ये सर्व मठ मंदिर, सामाजिक संस्था, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, व्यापारी संघटन, विश्व हिंदू परीषद, बजरंग दल, यंग चांदा ब्रिगेड, भारतीय जनता युवा मोर्चा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कमाल स्पोर्टिंग क्लब, जगदंब ग्रुप, शिवछत्रपती प्रतिष्ठान, विश्वकर्मा जांगीड समाज, महावीर समाज, प्यार फाऊनडेशन, हिंदी ब्राम्हण समाज, राजस्थानी ब्राम्हन समाज, पंजाबी समाज सेवा समिती , चर्मकार समाज, सुदर्शन समाज, तेली समाज, कुनबी समाज, आर्य वैश्य कोमटी समाज, सोनार समाज, सिंधी समाज, क्षत्रिय स्वर्णकार महिला मंडळ, अग्रवाल समाज, जैन समाज व सर्व समाजातील युवा संघटन, सांस्कृतिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी देखील या बैठकीमध्ये सक्रीयपणे सहभागी होते. तसेच अनेक संघटनांना शोभायात्रेतील व्यवस्थेच्या संदर्भातील जवाबदाऱ्या देण्यात आल्या. शहराच्या केंद्रस्थानी सामुहिक रामजन्मोत्सव विराट स्वरूपात आयोजित व्हवा याची सुरुवात हिंदू नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्यापासून करण्यात आली आहे. या शोभायात्रेत विविध प्रभागातून अनेक देखावे –भजन मंडळ सादर होणार आहे व अन्य भागातून बऱ्याच शोभायात्रा निघून मुख्य शोभायात्रेत समाविष्ठ होणार आहे. शहरातील सर्व तरुण युवकांनी हजारोच्या संख्येने १० एप्रिल २०२२ ला शोभायात्रेत सहभागी व्हावे व शहरातील सर्व प्रमुख संस्थांनी या शोभायात्रेचे स्वागत करावे असे आव्हान श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे. संपूर्ण बैठकीचे संचालन विजय यंगलवार यांनी केले.
रामजीवन परामार, डॉ. मंगेश गुलवाडे, सुनील महाकाले, दीपक बेले, राजेश सज्जनवार, उमाशंकर सिंग, विवेक आंबेकर, वामन आमटे, तुषार चौधरी, अमित करपे, रघुवीर अहिर, कपिश उजगावकर, सुरज पेदुलवार, राहुल ताकधट, विशाल गिरी, राहुल गायकवाड, शुभम दयालवार, आशिष मुंधडा, शुभम मुक्कावर, प्रज्वल कडू, शैलेश दिंडेवार, राजवीर यादव ,पियुष बुरांडे इत्यादि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
०९ एप्रिल ला भव्य बाईक रॅली चे आयोजन
श्रीराम नवमी निमित्य शहारत वातावरण निर्मिती व्हावी या हेतूने ९ एप्रिल २०२२ रोज शनिवार ला संघ्याकाळी ठीक ४.०० वाजता स्वामिनारायन मंदीर, ज्युबिली शाळेजवळून भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे. हि बाईक रॅली स्वामीनारायण मंदिर येथून निघेल व गिरनार चौक – गांधी चौक – जटपुरा गेट- रामनगर – वरोरा नका चौक –प्रियदर्शनी चौक –कस्तुरबा मार्ग –गिरनार चौक - शिवाजी चौक येथे रॅली ची सांगता होणार. तरी या रॅली मध्ये महिला-पुरुष , युवती- युवक , सर्व वयाच्या रामभक्तांनी संम्मिलीत व्हावे. असे आव्हान बाईक रॅली आयोजन समिती तर्फे करण्यात येत आहे.
Prabhu Shriram Janmotsav Shobhayatra Chandrapur.