नांदेड जिल्ह्यतील सुप्रसिद्ध संजय बियाणी हत्या निषेधार्थ चंद्रपुर माहेश्वरी समाजा तर्फे जाहीर निषेध Public protest by Chandrapur Maheshwari Samaj against the murder of well known Sanjay Biyani in Nanded district


नांदेड जिल्ह्यतील सुप्रसिद्ध संजय बियाणी हत्या निषेधार्थ चंद्रपुर माहेश्वरी समाजा तर्फे जाहीर निषेध

 #Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 07 अप्रैल: नांदेड जिल्ह्यतील सुप्रसिद्ध उद्योजक व उत्कृष्ट समाजसेवक संजय बियाणी यांच्या वर भ्याड हल्लाकरून त्यांची क्रुरतापूर्वक हत्या केल्या निषेधार्थ संपूर्ण माहेश्वरी समाजा तर्फे जाहीर निषेध दिनांक ०५.०४.२०२२ रोजी माहेश्वरी समाजाचे सन्मानीय सदस्य व नांदेड शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायी व उत्कृष्ट समाजसेवक स्व.संजयजी बियाणी यांच्यावर त्याच्या राहत्या घरासमोर भरदिवसा गोळीबार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा चंद्रपूर माहेश्वरी समाज, चंद्रपूर सिंधी समाज, व्यापारी मंडल, चंद्रपूर तर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले. 
दिनांक ०७.०४.२०२२ ला चंद्रपूर माहेश्वरी समाजा तर्फे चंद्रपुर जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व महाराष्ट्र पोलिस संघचालक यांना निवेदन देण्यात आले. नांदेड येथील स्व.संजयजी बियाणी यांच्यावर भरदिवसा त्यांच्या घरासमोर झालेल्या क्रूरतापूर्वक हत्येच्या तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आज चंद्रपुर माहेश्वरी समाजाने केली आहे.   
चंद्रपुर जिला माहेश्वरी संगठन चे अध्यक्ष डॉ सुशिल मुंधडा यांनी असे संबोधित केले की, माहेश्वरी समाज हा सतत शांतताप्रिय समाज असून समाजकार्य व देशहितात सदैव पुढे असतो. आपण संपूर्ण समाजाचे काही देणे लागतो हीच उच्चं भावना आपल्या घरी बाळगून समाज कार्यात आपले तन मन धन लावून सतत कार्यरत असतो. स्व.संजयजी बियाणी सुद्धा एक उत्कृष्ट समाजसेवक होते. ही हत्या आसमाजिक तत्वां द्वारे पैशाच्या खंडणीसाठी केली आहे असा संशय माहेश्वरी समाजाने व्यक्त केला आहे. हा हल्ला फक्त स्व.संजयजी बियाणी यांवर झाला नसून संपूर्ण माहेश्वरी समाजा सोबतच भारताच्या प्रत्येक व्यावसायिक वर व प्रत्येक समाजसेवकावर झाला आहे, असे माहेश्वरी समाज मानतो. सोबतच, संपूर्ण माहेश्वरी समाजा तर्फे अशी घोषणा करण्यात आली की, जर स्व.संजय बियाणी यांच्या परिवरास लवकरात लवकर न्याय मिळाले नाही तर भारतीय संविधानाच्या सर्व नियमांचे व भारतीय कायद्यांचे पालन करून संपूर्ण माहेश्वरी समाज एक भव्य जन आंदोलन करेल.   
चंद्रपुर जिल्हा माहेश्वरी संगठनचे अध्यक्ष डॉ सुशिल मुंधडा, सचिव शिवनारायण सारडा, चंद्रपुर जिल्हा माहेश्वरी महिला संगठनची अध्यक्षा सौ.दुर्गा सारडा, सचिव राधिका मुंधडा, माहेश्वरी सेवा समितिचे सचिव सुरेश राठी, माहेश्वरी युवक मंडलचे अध्यक्ष मनीष बजाज, पंकज सारडा, व्यापारी मंडल, चंद्रपुरचे अध्यक्ष रामजीवन परमार, सचिव प्रभाकर मंत्री, राजू पंजाबी, सुमेध कोतपाललीवार, गिरीश चांडक, गोपाल मुंधडा, चंद्रकांत बजाज, दिनेश बजाज, दामोदर मंत्री, जुगल सोमाणी, मुकुंद गांधी, रमेश मुंधडा, सुनीता सोमाणी, सिंधी समाजाचे अध्यक्ष तहलीयाणी सचिव अशोक हसानी, माहेश्वरी महिला मंडल अध्यक्ष इंदु जाजू, सुनीता सोमाणी, दीपक सोमाणी, ललित कासट, विनोद सोनी, गोविंद तेला, विजय करवा, ऋषिकांत जखोटीया, नितिन जाजू, गौरव लाहोटी, आशिष तोष्णीवाल, अर्जुन राठी, चंद्रपुर जिला माहेश्वरी युवा संगठन के अध्यक्ष आश्विन सारडा, सचिव पियूष माहेश्वरी व माहेश्वरी समाजाचे इतर सदस्य उपस्थित होते.
Public protest by Chandrapur Maheshwari Samaj against the murder of well known Sanjay Biyani in Nanded district.