मंदिर असो किंवा मशीद असो लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावी, या निर्णयाचे मी स्वागत करतो मोहित कंबोज, भाजप नेते Whether it is a temple or a mosque, if you want to play loudspeakers, you should play with permission, I welcome this decision Mohit Kamboj, BJP leader

मंदिर असो किंवा मशीद असो लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावी

या निर्णयाचे मी स्वागत करतो मोहित कंबोज, भाजप नेते 

#Loktantrakiawaaz
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मंदिर असो किंवा मशीद असो लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावी त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो.

मी गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की येत्या काळात मशिदीवर लाऊड स्पीकर लावण्यासाठी जी नियमावली तुम्ही ठरवणार आहात तीच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकर बाबत ठरवावी.
80 टक्के लाऊडस्पीकर हे मदरशांवर लावलेले आहेत 20 टक्के लाऊड स्पीकर हे मशिदीवर आहेत त्यामुळे मदरशां वरील लाऊडस्पीकर हे काढून टाकले पाहिजेत आणि जी मशीद अनधिकृत आहेत त्या मशिदीला लाऊडस्पीकर ची परवानगी दिली जाऊ नये.
माझी महाराष्ट्र सरकार ला विनंती आहे की सर्व लोकांनी एकत्रित येऊन ही सामाजिक चळवळ सुरु केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे जे काही नियम आहेत ते नियम सरकारने योग्य रीतीने राबवावे आणि मशिदीवरील अनधिकृत भोंगे हे उतरवावे आणि याची सुरुवात मुंबईतून होईल. मुंबईमधून सर्व देशाला दिशा मिळेल.

Whether it is a temple or a mosque, if you want to play loudspeakers, you should play with permission, I welcome this decision Mohit Kamboj, BJP leader.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.