बाबुपेठ येथील डॉ. शरयु पाझारे यांच्या सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर मनपातर्फे कारवाई
पीसीपीएनडीटी व MTP ( वैद्यकीय गर्भपात कायदा ) ऍक्ट अंतर्गत कारवाई
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर १८ मे :अभिलेखांची देखभाल न केल्याने ( Non Maintenance of Records ) पीसीपीएनडीटी व वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाल्याचा ठपका ठेवून बाबुपेठ येथील डॉ. सौ. शरयु सुधाकर पाझारे यांच्या पाझारे नर्सिंग होम, येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी क्रं . १७८० चे नोंदणी प्रमाणपत्र 30 दिवसांसाठी निलंबीत करण्यात आले आहे.
ही कारवाई चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे करण्यात आली आहे. सदर केंद्राची नोंदणीकृत सोनोग्राफी मशीन सील करण्यात आली आहे. १३ मे रोजी झालेल्या पीसीपीएनडीटी सल्लागार समिती बैठकीतील निर्णयानुसार मनपा आरोग्य विभागामार्फत सदर वैद्यकीय गर्भपात केंद्राची तपासणी करण्यात आली , तपासणीत अभिलेखांची देखभाल न केल्याचे आढळुन आले होते. त्यामुळे पाझारे नर्सिंग होम यांचे वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी प्रमाणपत्र दि .१८ / ०५ / २०२२ पासुन निलंबित करण्यात आले आहे .
सदर कालावधीत पाझारे तर्सिंग होम येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र हे कायम स्वरूपी बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. बंदी करण्यात आलेल्या कालावधीत वैद्यकीय गर्भपात केंद्रा संबंधी काही प्रकार घडल्यास किंवा सदर घटना पुन्हा उपरोक्त संदर्भात घडल्यास The Medical Termination of Pregnancy ) Act 1971 and The Mumbai Nursing Home ( Amendment ) Act 2006 , The Maharashtra Nursing Home Registration ( Amendment ) Act 2006 कायद्याअन्वये मनपा कडून प्रशासकिय कार्यवाही केली जाईल, अशी ताकीद देण्यात आली आहे तसेच वैद्यकीय गर्भपात केंद्रात आढळलेल्या त्रुटींची पुर्तता करून त्यासंबंधीचा अहवाल मनपा आरोग्य विभाग येथे सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर मनपा आरोग्य विभागाकडून फेर तपासणी करण्यात येईल व त्यानंतरच वैद्यकीय गर्भपात केंद्र पुर्ववत सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
Action on sonography and medical abortion center by Chandrapur Municipal Corporation, Dr. at Babupeth. Municipal Corporation takes action against Sharyu Pazare's sonography and medical abortion center.
बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.