सत्‍तेसाठी नाही तर सत्‍यासाठी कार्य करणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा – आ. सुधीर मुनगंटीवार, बल्‍लारपूर येथे २८१ कार्यकर्त्‍यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश Activist of Bharatiya Janata Party who works not for power, 281 activists join Bharatiya Janata Party mla Sudhir Mungantiwar, Ballarpur

सत्‍तेसाठी नाही तर सत्‍यासाठी कार्य करणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा – आ. सुधीर मुनगंटीवार

बल्‍लारपूर येथे २८१ कार्यकर्त्‍यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर/बल्लारपुर: भारतीय स्‍वतंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात हृदयात सेवाभाव घेऊन सत्‍ता नाही तर सत्‍य हाच संकल्‍प घेऊन गरीबातील गरीब माणसाच्‍या उन्‍नतीकरिता भारतीय जनता पार्टीला मजबूत करणे आपले लक्ष्‍य असले पाहीजे. सामान्‍य नागरिकांच्‍या जीवनामध्‍ये बदल घडविण्‍यासाठी व आनंद पेरण्‍यासाठी सर्वांनी मिळून पक्षाचा विस्‍तार सर्वत्र करणे आपली जबाबदारी आहे. विश्‍वगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशाला जागतीक सत्‍ता बनविण्‍याचा संकल्‍प केला असताना आपणही त्‍यांच्‍यासोबत असणे गरजेचे आहे, असे लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्‍लारपूर भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते.

दिनांक २२ मे २०२२ रोजी बल्‍लारपूर येथे भारतीय जनता पार्टी मध्‍ये २८१ कार्यकर्त्‍यांनी प्रवेश केला. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी प्रामुख्‍याने वनविकास महामंडळाचे माजी अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपाचे ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, सौ. रेणुका दुधे, बल्‍लारपूर भाजपा शहर अध्‍यक्ष काशी सिंह, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्‍यक्ष विवेक बोढे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, निलेश खरबडे, शिवचंद द्विवेदी महाराज, राम लाखियॉ, ट्रान्‍सपोर्ट सेल अध्‍यक्ष राजू दारी, कैलास गुप्‍ता, मनिष रामिल्‍ला, वैशाली जोशी, कांता ढोके, बुचय्या कंदीवार, सतीश कनकम, प्रतीक बारसागडे, गुलशन शर्मा यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
पुढे आ. मुनगंटीवार म्‍हणाले, भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेवून विजय संकल्‍प करण्‍याकरिता विभिन्‍न प्रवर्ग, जाती, धर्माचे सर्व लोक देशप्रेमाने एकत्र आले. या विश्‍वासाला पुढे नेत नागरिकांची प्रगती, उन्‍नती, विकासाचा विचार करून काम करू या. बल्‍लारपूरातील युवक, युवती, महिला, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे नागरिकांनी   भारतीय जनता पार्टीवर विश्‍वास ठेऊन पक्षप्रवेश केला या सा-यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्‍वागत करतो.

विश्‍वात सर्वात वैभवशाली, संपन्‍न देश उभा करण्‍याकरिता विश्‍वगौरव नरेंद्रजी मोदी अहोरात्र कार्य करीत आहे. स्‍वातंत्र्य लढयातील शहीदांचे बलिदान व्‍यर्थ न जावो यासाठी ते कार्यरत आहे. कोरोना काळात ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य  देण्‍यात आले. आयुष्‍यमान योजना गरीबांसाठी राबविण्‍यात आली. १२ रूपयांमध्‍ये विमा काढण्‍यात आला. ४० कोटी परिवारांचे बॅंकेत जनधन खाते काढण्‍यात आले. देशातील १२ कोटी शेतक-यांना किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला ६ हजार रू. त्यांच्या खात्यात  करण्‍यात आले, असेही आ. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.
चिचपल्‍ली येथे अपघातात ९ मजूरांचा मृत्‍यु झाला. याबाबत मी मुख्‍यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधुन प्रत्‍येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य मंजूर केले. दारिद्रय रेषेखालील मृत व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांला प्रत्‍येकी २० हजार रूपये व अंत्‍योदय रेशन कार्ड मंजूर करवून घेतले. मी राज्‍याचा अर्थमंत्री असताना निराधार, घटस्‍फोटिता, विधवा, दिव्‍यांग यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एक हजार रूपये मंजूर केले. पूर्वी फक्‍त ६०० रू. मिळत होते. एक मुलगा असल्‍यास ११०० रू व दोन मुले असल्‍यास १२०० रूपये मंजूर करण्‍यात आले. ना. अजित पवारांना आवडले असे कॅन्‍सर हॉस्‍पीटल टाटा ट्रस्‍टच्‍या मदतीने  चंद्रपूरमध्‍ये उभारण्‍यात आले. राज्‍यातील २०० नगर पंचायतींमध्‍ये नाही अशी  सर्व सोयींनी युक्‍त पोंभुर्णा नगर पंचायतीची आकर्षक इमारत उभारण्‍यात आली.

आज या ठिकाणी मोठा पक्षप्रवेश झाला. हा पक्षप्रवेश सामान्‍य माणसाच्‍या उन्‍नतीकरिता आणि पक्षाचे संघटन मजबूत करण्‍याकरिता कार्य करा, बचतगटांच्‍या महिलासाठी रोजगार निर्माण व्‍हावा, युवकांमध्‍ये कौशल्‍य वृध्‍दींगत व्‍हावे. चंद्रपूर जिल्‍हा देशातच नव्‍हे तर जगामध्‍ये श्रेष्‍ठ ठरावा यासाठी आपण सर्वांनी मिळवून कार्य करू असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे संचालन काशी सिंह यांनी केले.
हा पक्षप्रवेशकार्यक्रम  यशस्‍वी करण्‍यासाठी कैलास गुप्ता, मनीष रामिल्ला, प्रतीक बरसागडे आणि गुलशन शर्मा यांनी अथक परिश्रम घेतले.

Activist of Bharatiya Janata Party who works not for power, 281 activists join Bharatiya Janata Party mla Sudhir Mungantiwar, Ballarpur.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.