ओबीसी नेतृत्व सम्पविण्याचा डाव सरकारने साध्य केला - आमदार संजय कुटे Govt succeeds in ending OBC leadership - MLA Sanjay Kute

ओबीसी नेतृत्व सम्पविण्याचा डाव सरकारने साध्य केला - आमदार संजय कुटे

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर/मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (local body elections) सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे.

राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम पुढील दोन आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी निवडणुका घेणे शक्य नसल्याची भूमिका आयोगाने घेतली होती. पण त्यानंतरही न्यायालयाने हा आदेश दिल्याने आयोगासह राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारने ओबीसी समाजाचा घात केला असल्याचा आरोप आमदार संजय कुटे (mla sanjay kute) यांनी लावला आहे.

(Obc Political Reservation) मागील 2 वर्षांपासून सरकार ओबीसी समाजाला आरक्षणाच्या नावावर फक्त वेळ घालवीत आहे, आघाडीचे नेते फक्त चिंतन शिबीर व मेळावे घेत आहे, सध्या ओबीसी समाज महाविकास आघाडी सरकारवर संतापली आहे. ओबीसी obc नेतृत्वाला सम्पविण्याचा डाव सरकारच्या मनात होता तो साध्य झाला अशी प्रतिक्रिया आमदार संजय कुटे यांनी दिली.

Govt succeeds in ending OBC leadership - MLA Sanjay Kute.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.