चंद्रपुर जैन मंदिर परिसरातील के.बी. बिअर शॉपी हि अनुज्ञप्ती बंद अली, चंद्रपुर जिल्ह्यातील पहिली कारवाई, महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९ ४९ चे कलम १४२ (१) नुसार बंद करण्यांचे आदेश K.B. Beer Shopee Chandrapur Jain Temple. Beer Shop License Closed, First Action in Chandrapur District, Order to Close as per Section 142 (1) of Maharashtra Prohibition Act, 1949

चंद्रपुर जैन मंदिर परिसरातील के.बी. बिअर शॉपी हि अनुज्ञप्ती बंद अली

चंद्रपुर जिल्ह्यातील पहिली कारवाई

महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९ ४९ चे कलम १४२ (१) नुसार बंद करण्यांचे आदेश 

चंद्रपुर: जैन समाजातील लोंक मंदीर परीसरातील दुकानदार / रहिवाशी यांचे निवेदन दिनांक १०/५/२०२२ नुसार त्यांनी जैन मंदीर परीसरातील श्री . व्यकंटेश विलास काळे यांचे नावे असलेली के.बी. बिअर शॉपी हि अनुज्ञप्ती बंद करण्यांची विनंती केलेली होती . उपरोक्त निवेदनाचे अनुषंगाने निरीक्षक रा.उ.शु चंद्रपुर यांचे कडुन चौकशी अहवाल मागविण्यांत आलेला होता . त्यांनी वाचा क्र .२ नुसार चौकशी अहवाल सादर केलेला आहे . उपरोक्त अहवालात त्यांनी नमुद केलेले आहे की , प्रकरणी संबधीत दुय्यम निरीक्षक चंद्रपुर शहर यांचेकडुन चौकशी केलेली असुन त्यांचा अहवाल सोबत सादर केलेला आहे . उपरोक्त अहवालात नमुद केलेले आहे की श्री . व्यकंटेश विलास कहाळे यांचे नावे मंजुर असलेली मौजे . जैन मंदीर परीसर गांधी चौक चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर येथील एफएल - बिआर -२ अनुज्ञप्ती क्रमांक ९९ ही अनुज्ञप्ती बंद करण्याबाबत संदर्भीय क्र .२ निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले होते . सदर निवेदनाचे अनुषंगाने चौकशी अहवाल मागविण्यांत आला असता संदर्भ क्र .३ नुसार निरीक्षक राउशु चंद्रपुर यांनी चौकशी अहवाल सादर केलेला आहे . उपरोक्त अहवालात त्यांनी नमुद केलेले आहे की , जैन मंदीर परीसर गांधी चौक चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर येथील चंद्रपुर महानगरपालीका हददीतील नगर भूमापन क्रमांक ६१०२ , शिट नं ४ ९ येथे बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळयामध्ये के.बी. बियर शॉपी या नावांने ( एफएलबीआर -२ अनुज्ञप्ती ) अर्जदार श्री . व्यंकटेश विलास काहाळे रा.साई बाबा वार्ड सिव्हील लाईन चंद्रपुर ता . जि . चंद्रपुर यांचे नावे मंजुर करण्यांत आले असुन , याबाबत सदर प्रकरणी तक्रारकर्ते जैन समाजातील लोंक मंदीर परीसरातील दुकानदार / रहिवाशी यांचे दिनांक १०/५/२०२२ चे तक्रारीचे अनुषंगाने दि .१७ / ५ / २०२२ रोजी प्रत्यक्षांत जागेवर जावुन चौकशी केली असता , आक्षेप अर्जात नमुद बाबीची अनुषंगाने पाहणी केली असता तक्रारीत नमुद जैन मंदीर हे चंद्रपुर शहरातील गांधी चौक येथे स्थित असुन , प्रत्येक दिवशी जैन समाजाचे महिला / पुरुष , मुले व वयोवृध्द मंदिरात देवदर्शनाला ये - जा करीत असतात , तसेच त्याच परीसरात गोल बाजार नावाची बाजारपेठ असुन सर्वसामान्य जनतेची तिथे रहदारी असते तसेच काही अंतरावर चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन आहे . त्याअनुषंगाने जैन समाजातील लोकांचे , परीसरातील दुकानदार / रहिवाशी या सर्वाचे संयुक्त जबाब नोंदविले असता त्यांनी त्यांचे जबाबात नोंदविले की , सदर के.बी. बियर शॉपी ही जैन मंदीराच्या प्रवेशव्दारासमोर काही मीटर अंतरावर असुन , चंद्रपुर शहरातील धार्मीक अल्पसंख्याक जैन समाजाचे एकमेव श्रध्दास्थान असुन जैन मंदीरात प्रत्येक दिवशी धार्मीक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत येत असतात त्यामुळे मोठ्या संख्येने समाजबांधक सहभागी होत असतात त्या सर्वाची धार्मीक भावना व श्रध्दा सदर जैन मंदिराशी खुप वर्षापासुन जुळलेली असुन सदर मंदीर हे मंदीर नसुन जैन समाजाचे व स्थानिक नागरिकांच्या धार्मीक व सामाजिक एकोपाची
श्रध्दास्थान आहे . 

सदर मंदीराबाबतची जनमते त्यांच्या संयुक्त जबाबात नोंदवुन सादर केले सादर केले आहे . सादर केलेल्या संयुक्त जबाबात नांवासह स्वाक्षरी केलेल्या एकुण १६० जनमताचा विनंती विचारात घेता तथा जैन समाजाचे असलेले श्रध्दास्थान जैन मंदीर व तिथे येणा - या जैन समाजातील लोकांचे धार्मीक भावना व परीसरातील दुकानदार / रहिवाशी व जैन धर्मातील लोकांचा सदर बिअर शॉपीला असलेला तीव्र विरोध लक्षात घेता सदर बियर शॉपी बंद करणे योग्य होईल असे या कार्यालयाचे मत आहे . असे अहवालात नमुद केलेले आहे . तसेच प्रकरणी पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचेकडुन कायदा व सुव्यस्थेबाबतचा अहवाल मागविण्यांत आला असता त्यांनी संदर्भ क्र. ३ नुसार अहवाल सादर केलेला आहे . उपरोक्त अहवालात त्यांनी नमुद केलेले आहे की , पोलीस स्टेशन , चंद्रपुर शहर कार्यक्षेत्रातील श्री . व्यंकटेश विलास कहाळे यांचे नावे मंजुर असलेली जैन मंदिर परीसरातील सराफा लाईन , गांधी चौक ता.जि. चंद्रपुर येथील एफएल - बिआर -२ क्रमांक १ ९ ही बंद करण्याची मागणी जैन समाज बांधव व परीसरातील दुकानदार व रहीवाशी यांनी केली असल्याने सदरील परीसराची मौका पाहणी करण्यात आली असुन अनुज्ञप्तीचे चर्तुसीमाचे बाजुस खालील प्रमाणे आस्थापना व इमारती आहे . पुर्वेस मागील बाजुस फॅशन क्विन नावाचे दुकानाचे गाळे असुन सदर गाळयाचे बाजुस पुर्वेस अंदाजे १५ फुट जागा असुन सदर जागेत पुरातन विहिर व आरव ज्वेलर्स दुकान तसेच विहिलचे लगत श्री . जैन श्वेतावर मंदिराची सिमा भित आहे . पश्चिमेस गोल बाजार जाणारा सिमेंट क्राकीटचा रोड व रोड लगत कासार्लेसकर ज्वेलर्स , एलआयसी केंद्र व इतर व्यवसाईक दुकान गाळे आहेत . उत्तरेस अनुज्ञप्तीचे अगदी काही फुटावर माधव वॉच अॅन्ड बेटेक्स ज्वेलरी स्टोअर्स दुकान व इतर व्यावसायीक दुकान गाळे आहेत . दक्षिणेस दस्तगीर चौक ते गांधी चौक कडे जाणारा मुख्य मार्ग व त्या पलीकडे मनपाची सात मजली इमारत आहे . सदर अनुज्ञप्तीचे परीसरात शहरातील शंभर वर्षापेक्षा जास्त काळ पुर्वीचे श्री . जैन श्वेतांबर मंदिर अगदी जवळ असुन सदर मंदीरात जैन धर्मीयांचे पुजा अर्चा , उत्सव नियमीत संपन्न होत असुन जैन धर्मीयांचे धर्म गुरु संताचे नेहमी अवागमन होत असते . तसेच सदर परीसरात ज्वेलर्स व इतर सर्व प्रकारचे व्यवसायीक दुकानाची बाजारपेठ असुन सदर परीसरातील सुरु अनुज्ञप्ती बंद करण्याची मागणी जैन समाज बांधव व परीसरातील दुकानदार व रहीवाशी यांनी केली असल्याने ती बंद न झाल्यास याबाबत रोष निर्माण होवुन भविष्यात जातीय तणाव निर्माण होवुन सामाजीक शांतता भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे . यास्तव जनमत लक्षात घेता सदर अनुज्ञप्ती ही या परीसरात बंद करुन इतर ठिकाणी स्थलातरीत करण्यांत यावी . पोलीस निरीक्षक , पो.स्टे . चंद्रपुर शहर व उपविभागीय पोलीस अधीकारी , चंद्रपुर यांनी सदर परीसरातील सुरु असलेली अनुज्ञप्ती बंद करण्याची मागणी जैन समाज बांधव व परीसरात दुकानदार व रहीवाशी यांनी केली असल्याने ती बंद न झाल्यास याबाबत रोष निर्माण होवुन भविष्यांत जातीय तणाव निर्माण होवुन सामाजीक शांतता भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे . यास्तव जनमत लक्षात घेता सदर अनुज्ञप्ती ही या परीसरात बंद करुन इतर ठिकाणी स्थलांतर करण्यांत यावी . अशा अभिप्रायासह वरील प्रमाणे अहवाल सादर केला आहे . करीता भविष्यात जातीय तणाव निर्माण होवुन सामाजिक शांतता भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर अनुज्ञप्ती ही या परीसरात बंद करुन इतर ठिकाणी स्थलातर करण्यांत यावी . अशी शिफारस करण्यांत येत आहे. 

असे पत्रात नमुद केलेले आहे . निष्कर्ष : - प्रकरणातील वस्तुस्थीती व चौकशी अहवाल तसेच पोलीस विभागाकडील अहवाल लक्षात घेता श्री . व्यकंटेश विलास कहाळे यांचे नावे मंजूर असलेली मौजे.जैन मंदीर परीसर गांधी चौक चंद्रपुर ता . जि . चंद्रपुर येथील एफएल - बिआर २ अनुज्ञप्ती क्रमांक ९९ या अनुज्ञप्तीबाबत जैन समाजातील लॉक मंदीर परीसरातील दुकानदार / रहिवाशी यांचा तिव्र विरोध दिसुन येत आहे . तसेच सदर बिअर शॉपी चंद्रपुर शहरातील गोल बाजार व्यावसायीक परीसरातील आहे . करीता उपरोक्त बिअर शॉपी परीसरातील  दुकानदार / रहिवाशी यांचा तिव्र विरोध लक्षात घेता तसेच प्रकरणी कायदा व सुव्यस्थेबाबतची परीस्थीती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सदर एफएल - बिआर -२ अनुज्ञप्ती बंद करणे उचित राहील या निष्कर्षाप्रत मी पोहचलो आहे.करीता पुढील प्रमाणे आदेश देत आहे . आदेश : - उपरोक्त प्रकरणाची वस्तुस्थीती व निष्कर्ष लक्षात घेता श्री . व्यकंटेश विलास कहाळे यांचे नावे मंजुर असलेली मौजे.जैन मंदीर परीसर गांधी चौक चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर येथील एफएल - बिआर -२ अनुज्ञप्ती क्रमांक ९९ हि अनुज्ञप्ती शासन अधीसुचना दि . २० सप्टेंबर २०१ ९ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार९ ४ ९ चे कलम १४२ ( १ ) नुसार बंद करण्यांचे आदेश याव्दारे देण्यांत येत आहे .२० सप्टेंबर २०१ ९ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा १ ९ ४ ९ चे कलम १४२ ( १ ) नुसार बंद करण्यांचे आदेश याव्दारे देण्यांत येत आहे .२० सप्टेंबर २०१ ९ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा १ ९ ४ ९ चे कलम १४२ ( १ ) नुसार बंद करण्यांचे आदेश याव्दारे देण्यांत येत आहे . २० सप्टेंबर २०१ ९ अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा १ ९ ४ ९ चे कलम १४२ ( १ ) नुसार बंद करण्यांचे आदेश याव्दारे देण्यांत येत आहे .

K.B. Beer Shopee Chandrapur Jain Temple.  Beer Shop License Closed, First Action in Chandrapur District, Order to Close as per Section 142 (1) of Maharashtra Prohibition Act, 1949