आ. सुधीर मुनगंटीवार हे गोरगरीबांसाठी देवदूत – चंदनसिंह चंदेल, बल्‍लारपूर येथे मोफत कॅन्‍सर तपासणी शिबीर संपन्‍न, श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूरचा उपक्रम mla Sudhir Mungantiwar is an angel for the poor -

आ. सुधीर मुनगंटीवार हे गोरगरीबांसाठी देवदूत – चंदनसिंह चंदेल

बल्‍लारपूर येथे मोफत कॅन्‍सर तपासणी शिबीर संपन्‍न

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूरचा उपक्रम

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: विकासकामांची दिर्घ मालिका, सतत सेवाभावी उपक्रमांचे आयोजन या माध्‍यमातुन जनतेची अविरत सेवा करणारे आ. सुधीर मुनगंटीवार या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत हे आमचे भाग्‍य आहे. गोरगरीब जनतेच्‍या हितासाठी त्‍यांना उत्‍तम आरोग्‍य सुविधा मिळाव्‍या यासाठी ते सातत्‍याने प्रयत्‍नशील असतात. या निःशुल्‍क कॅन्‍सर तपासणी शिबीराच्‍या माध्‍यमातुन गोरगरीब जनतेला सहज सुलभ पध्‍दतीने उपचार मिळावे या उद्देशाने त्‍यांनी हे आयोजन केले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार हे गोरगरीबांसाठी देवदूतच असल्‍याचे प्रतिपादन भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे माजी अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.
दिनांक २ मे २०२२ रोजी बल्‍लारपूर येथील गोंडराजे बल्‍लाळशाह नाटयगृह येथे आयोजित मोफत कॅन्‍सर तपासणी शिबीराच्‍या उदघाटन समारंभारत श्री. चंदनसिंह चंदेल बोलत होते. यावेळी भाजपाचे बल्‍लारपूर अध्‍यक्ष काशीनाथ सिंह, सौ. रेणुका दुधे, सौ. रेणका दुधे, अॅड. रणंजय सिंह, वैशाली जोशी, संध्‍या मिश्रा, सुवर्णा भटारकर, सारिका कनकम, जयश्री मोहुर्ले, अर्चना हिरे, श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूरचे सचिव श्री. राजेश सुरावार, शैलेंद्रसिंह बैस आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना चंदनसिंह चंदेल पुढे म्‍हणाले, आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्‍य क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केली आहे. चंद्रपूर जिल्‍हयात उत्‍तम आरोग्‍य सेवा नागरिकांना उपलब्‍ध व्‍हावी यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने कॅन्‍सर हॉस्‍पीटल उभारण्‍याची प्रक्रिया सुरू आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय कार्यान्‍वीत करण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर जिल्‍हयात १४ नविन प्राथमिक केंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्‍यात आले. पोंभुर्णा येथे अद्यावत व सर्व सोयींनी सुसज्‍ज अशा ग्रामीण रूग्‍णालयाचे बांधकाम करण्‍यात आले. खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन आदिवासी बहुल भागातील भंगाराम तळोधी, नांदा, जिवती आणि राजोली या गावांमध्‍ये प्राथमिक आरोग्‍य केंद्रांचे बांधकाम, बल्‍लारपूर येथे ग्रामीण रूग्‍णालय, ग्रामीण आरोग्‍य प्रशिक्षण केंद्र, वसतीगृह व मेसचे बांधकाम, मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे बांधकाम, बल्‍लारपूर तालुक्‍यातील कळमना येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्र इमारतीचे बांधकाम, पोंभुर्णा तालुक्‍यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पागतच्‍या आदिवासी बहुल गावांमध्‍ये फिरते रूग्‍णालय उपलब्‍ध, चंद्रपूर जिल्‍हयात पहिल्‍यांदाच रेल्‍वेमार्फत लाईफलाईन एक्‍सप्रेसच्‍यसा माध्‍यमातुन रूग्‍णसेवा हे उपक्रम त्‍यांच्‍या पुढाकाराने राबविण्‍यात आले.
हे मोफत कॅन्‍सर तपासणी शिबीर स्‍व. चांगुणाबाई वैद्यकिय मदत कक्ष, श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर यांच्‍या माध्‍यमाने तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने आयोजित करण्‍यात आले होते. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्‍सर हॉस्‍पीटल नागपूर यांचे विशेष सहकार्य या शिबीरासाठी लाभले. येथील तज्ञ डॉक्‍टरांनी रूग्‍णांची तपासणी केली. या शिबीरामध्‍ये ५६ रूग्‍णांची तपासणी झाली. त्‍यामधील २६ रूग्‍ण कॅन्‍सरग्रस्‍त आढळले.  या कॅन्‍सरग्रस्‍त रूग्‍णांना पुढील मोफत उपचारासाठी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्‍सर हॉस्‍पीटल नागपूर येथे पाठविण्‍यात येणार आहे.

स्‍व. चांगुणाबाई वैद्यकिय मदत कक्षाचे वैद्यकिय सहाय्यक सागर खडसे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आशिष सिंह यांनी केले तर संचालन विक्‍की दुपारे यांनी केले.

या कार्यक्रमाला स्‍वामी रायबरम, राजेश दासरवार, घनश्‍याम बुरडकर, राजेश शहा, मुन्‍ना श्रीवास, राजकुमार श्रीवास्‍तव, प्रभदिप सचदेवा, बबलु गुप्‍ता, सरोज सिंग, आशिष देवतळे, गुलषण शर्मा, मनिष रामीला, रिंकु गुप्‍ता, ओम प्रकाश प्रसाद, मोहीत डंगोरे, सतिश कनकम, निरज झाडे, किशोर मोहुर्ले, संजय वाजपेयी यांची उपस्थिती होती.

MLA Sudhir Mungantiwar is an angel for the poor.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.