तर दोन दिवसांत निघाले 106 जीआर (GR)
दर नवव्या मिनिटाला निघतोय एक जीआर (GR)
आमदारांना 319 कोटी रुपयांचे वितरण
मुबंई, 23 जुन: मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडानंतर आणि सुमारे 45 आमदार हे शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर,आता सरकार अस्थिर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही बुधवारी बंडखोरांना भावनिक आवाहन करत, वर्षा निवासस्थानावरुन आपला मुक्काम मातोश्री या निवासस्थानी हलवला आहे. सरकार अस्थिर झाल्यानंतर खरी पळापळ ही मंत्रालयात (Mantralay) सुरु झाली आहे. अनेक मंत्र्यांच्या खात्यातील राहिलेले शासन निर्णय तातडीने जारी करण्यात यावेत, यासाठी मंत्र्यांकडूनच दबाव येत असल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच अर्थ खात्यातूनही पैसे वितरणाला गती आल्याचे सांगण्यात येते आहे.
मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांचा विचार केला तर, मंत्रालयातून, 106 जीआर काढण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक जीआर हे पाणीपुरवठा आणि जलसंधारण विभागाचे आहेत. एका दिवसाच्या कामाचे आठ तास लक्षात घेतले तर दर नवव्या मिनिटाला एक जीआर काढण्यात आला आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या मृदू आणि जलसंधारण खात्यातून, 2 दिवसांत 23 जीआर काढण्यात आले आहेत. हे सर्व जीआर (GR) कोल्हापुरी आणि सिमेंट बंधाऱ्यांच्या किमती वाढवणारे आहेत. या किमती दीडपटाने वाढवणार आहेत.
अर्थ मंत्री अजित पवारांच्या अर्थ, नियोजन विभागानेही आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमाचा 319 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांना सर्वाधिक निधी मिळाला असल्याची माहिती आहे. या सर्व आमदारांना 1770 कोटी मिळणे अपेक्षित होते, त्यातील 319 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. 287 विधानसभा सदस्यांना प्रत्येकी 92 लाख रुपये देण्यात आले आहेत. अशी माहिती आहे.
The real chase started in the Ministry of Maharashtra.
106 GR in two days.
One GR goes out every nine minutes.
Distribution of Rs. 319 crore to MLAs.
बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.