चंद्रपूर, दि. 6 जून : कोविड-19 मुळे मृत पावलेल्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने 26 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णय प्रसारित केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाद्वारे ऑनलाइन पोर्टल विकसित केले असून याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. यासाठी https://mahacovid19relief.in या लिंकवर अर्ज करता येईल.
तथापि, सदर ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करून अद्यापही ज्या उमेदवारांना रुपये 50 हजार रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही, अशा अर्जदारांनी दि. 16 जून 2022 पर्यंत आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे अप्लीकेशन आयडी व अर्जदाराचे बँक पासबुकच्या प्रतसह संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. दिप्ती सूर्यवंशी यांनी केले आहे.
Covid-19 Sanugrah Grant:
Appeal to contact the applicants who have not received the grant in the bank account.