चंद्रपुर जिल्ह्यातील कोविडमुळे अनाथ झालेल्या 500 पेक्षा जास्त बालकांचे शैक्षणिक पुनवर्सन भारतीय जैन संघटना करणार, विद्यार्थ्यांनी त्वरित खालील नंबर वर संपर्क करावा Bhartiya Jain Sanghatna will provide educational rehabilitation to more than 500 children orphaned by Covid-19 in Chandrapur District, Students should immediately contact the following number

चंद्रपुर जिल्ह्यातील कोविडमुळे अनाथ झालेल्या 500 पेक्षा जास्त बालकांचे शैक्षणिक पुनवर्सन भारतीय जैन संघटना करणार

विद्यार्थ्यांनी त्वरित खालील नंबर वर  संपर्क करावा

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 22 जुन : भारतीय जैन संघटना 1993 पासून भूकंपग्रस्त, अनाथ,  निराधार, आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील बालके तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थी अशा अनेक विद्यार्थ्यांचे इ. 5 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्वांचे शैक्षणिक पुनवर्सन केले आहे.

चंद्रपुर जिल्ह्यातील कोविड -19 महामारीमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांचे शैक्षणिक पुनवर्सन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये वाघोली, पुणे शैक्षणिक पुनवर्सन प्रकल्पात प्रवेश देणार आहे. जे विद्यार्थी कोविडमुळे अनाथ झालेत. शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये बालक इयत्ता 5 वी, 6 वी व 7 वी मध्ये प्रवेशास पात्र आहे. एका कुटुंबातील एकाच विद्यार्थ्यांस प्रवेश दिला जाईल. शैक्षणिक पुनवर्सन प्रकल्पाच्या वसतीगृह पाठविण्यास पालकांची संमती गरजेची. बालकांची बीजेएसच्या (BJS) शैक्षणिक पुनवर्सन प्रकल्पात शिक्षण घेण्याची इच्छा असावी. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर व आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन निवड केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  इ 5 वी ते इ 12 वी पर्यंतचे शैक्षणिक पुनवर्सन केले जाईल. वरील निकषानुसार पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय जैन संघटना, शैक्षणिक पुनवर्सन प्रकल्प, वाघोली, पुणे येथील  
वसतीगृह पाठविण्यास येईल.

अशा विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क करावा असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे ब्रँड अँबेसिडर दीपक पारख चंद्रपुर, भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य सलाहगार अशोक संघवी, चंद्रपुर (मोबाईल- 9822200921) भारतीय जैन संघटना चंद्रपुर-गडचिरोली जिलाध्यक्ष गौतम कोठारी (मोबाइल- 9421062232) यांनी केले आहे.

Bhartiya Jain Sanghatna will provide educational rehabilitation to more than 500 children orphaned by Covid-19 in Chandrapur District.
Students should immediately contact the following number.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.