बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस मोनल मेश्राम यांचे अपघाती निधन Accidental death of Monal Meshram, a female police officer working at Ballarpur police station

बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस मोनल मेश्राम यांचे अपघाती निधन

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर / बल्लारपुर: बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस मोनल मेश्राम ह्यांच्या दुचाकीला राजुरा येथे मुख्य महामार्गावर मागुन येणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी 6:40 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार महिला पोलिस मोनल ह्या आपले कर्तव्य बजावून MH-34/AT- 1877 क्रमांकाच्या मायस्ट्रो दुचाकीने बल्लारपूर येथुन राजुरा येथे आपल्या राहत्या घरी परत येत असताना मागाहून येणाऱ्या MH-29/BE-4158 क्रमांकाच्या आयशर ट्रक ने धडक दिली. धडक बसताच त्या आपल्या मायस्ट्रो दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्या खाली कोसळल्या व डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात महावितरण विभागात कार्यरत पती विलास बनकर व दोन लहान मुले आहेत.

Accidental death of Monal Meshram, a female police officer working at Ballarpur police station.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.