भाजप सध्या 'वेट अँड वॉच' या भूमिकेत, भाजपच्या बैठकीनंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया BJP is currently in the role of 'Wait and Watch', MLA Sudhir Mungantiwar's reaction after the BJP meeting

भाजप सध्या 'वेट अँड वॉच' या भूमिकेत

भाजपच्या बैठकीनंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय सत्तासंघर्षाचा फायदा उचलून भाजप bjp बंडखोर आमदारांसोबत सत्तास्थापन करेल अशी चर्चा सुरु असताना याबाबत भाजपच्या कोअर कमिटीत नेमका काय निर्णय झाला, याबद्दल भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सध्यातरी वेट अँड वॉच या भूमिकेत असून अद्याप सरकार स्थापनेचा किंवा कोणत्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच शिंदे गटाकडून कोणताही प्रस्ताव भाजपला आला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार बोलत होते. 

महाराष्ट्रातील कधीही मविआ सरकार पडून नवं सरकार स्थापन होईल अशीही चर्चा आहे. यामध्ये भाजप या सर्वाचा फायदा घेऊन नवं सरकार स्थापन कऱण्याचीही दाट शक्यता आहे. याबाबतच बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना सध्यातरी असा कोणताही निर्णय़ भाजपने कोअर कमिटी बैठकीत घेतलेला नाही. तसंच कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर विधिमंडळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे आकलन केले गेले असून गरज पडल्यास पुन्हा कोअर टीमची बैठक घेऊन आम्ही निर्णय़ घेऊ, असंही ते म्हणाले.  

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील आमदारांना आताच अपात्र ठरवता येणार नाही, असं म्हटल्यामुळे एकनाथ शिंदे गटाला चांगलच स्फूरण चढलं आहे. शिंदे गटातील आमदारांना निलंबित करून त्यांची शक्ती कमकुवत करण्याचे शिवसेनेचे सर्व प्रयत्न सपशेल फेल गेल्याचं दिसून येत आहे. यातच 11 जुलै रोजी पुढील सुनावणी असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे हात बांधल्याची स्थिती आहे. तर शिंदे गटाने राज्यपालांना महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्यासाठी पत्र देण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यातील कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपत्कालीन स्थितीत विशेष अधिवेशन बोलवून महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांना असतो, असे जाणकार सांगतायत. त्यामुळे आता भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जोरकस प्रयत्न केल्यास सत्तास्थापनेबाबत राज्यपाल महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

BJP is currently in the role of 'Wait and Watch', MLA Sudhir Mungantiwar's reaction after the BJP meeting.