#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : 25 जून या दिवशी 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादल्या गेली. लोकशाही पुढे आव्हान उभ्या करणाऱ्या या आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह करीत कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या सत्याग्रही गिरीश अणे यांचा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या प्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजु घरोटे, जिल्हा सचिव प्रमोद शास्त्रकार, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राहुल सुर्यवंशी, गंगाधर कुंटावार, प्रकाश चांभारे, राहुल बनकर, रवि चावरे, अमोल मदने आदींची उपस्थिती होती.
यावेळी गिरीश अणे यांनी आपल्या मनोगतात आणीबाणीच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
Emergency Satyagrahi Girish Ane honored.
बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in
वर क्लिक करा.