दीर्घकाळ स्‍मरणात राहील अशी सुमधुर गीतांची मेजवानी, ‘मेरी आवाज ही पहचान है’लतादीदींना संस्‍कार भारतीची संगीतमय आदरांजली A feast of melodious songs that will be remembered for a long time, 'Meri Awaaz Hi Pehchan Hai'

दीर्घकाळ स्‍मरणात राहील अशी सुमधुर गीतांची मेजवानी

‘मेरी आवाज ही पहचान है’
लतादीदींना संस्‍कार भारतीची संगीतमय आदरांजली

चंद्रपुर: खचाखच भरलेले प्रियदर्शीनी सभागृह.... रसिक श्रोत्‍यांची मिळाणारी उत्‍स्‍फुर्त दाद.... भारतरत्‍न लतादीदींची एकाहुन एक सुरेल गाणी... मंत्रमुग्‍ध झालेल्‍या श्रोत्‍यांकडुन मिळणारा वन्‍समोर... दीदींच्‍या गाण्‍यांवर सादर होणारे नृत्‍याविष्‍कार.... रंगमंचावर प्रत्‍येक गीताच्‍या अनुषंगाने सादर होणारा सचित्र प्रवास.... निवेदनाच्‍या माध्‍यमातुन उलगडणारा लतादीदींचा माहितीपूर्ण जीवनपट.... हा सुरेल अनुभव दिला संस्‍कार भारती चंद्रपूरच्‍या ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मैफिलीने.....
२५ जुन ला चंद्रपूरच्‍या प्रियदर्शिनी सभागृहात संस्‍कार भारतीय चंद्रपूरतर्फे भारतरत्‍न स्‍व. लता मंगेशकर यांना ‘मेरी आवाज ही पहचान है’  या मैफिलीच्‍या माध्‍यमातुन संगीतमय आदरांजली देण्‍यात आली. चंद्रपूरातील जेष्‍ठ विधीज्ञ डॉ. रविंद्र भागवत, डॉ. शरदचंद्र सालफळे यांनी दीपप्रज्‍वलन करून कलावंतांना शुभेच्‍छा दिल्‍या. लतादीदींच्‍या प्रतिमेला मालापर्ण करून सरस्‍वती, भारतमाता व नटेश्‍वर पुजन करण्‍यात आले. संस्‍कार भारतीचे ध्‍येयगीत गायन व नृत्‍याच्‍या माध्‍यमातुन सादर करण्‍यात आले. त्‍यानंतर प्रत्‍यक्ष मैफिलीला सुरूवात झाली. दाता तु गणपती गजानन या नृत्‍यगीताने श्रीगणेशा झाला. प्रणाली पांडे हीने ‘मेरी आवाज ही पहचान है’ हे गीत सादर करून रसिकांची मने जिंकली. त्‍यानंतर मी रात टाकली, डौल मोराच्‍या मानाचा, ये जवळी घे, यारा सिली सिली, दिल हूमह हूम करे, मन क्‍यु बहका, सुर तेच छेडीता, देखा एक ख्‍याब, सुनो सजना, जो वादा किया, तुझे जीवन की डोर से, मेघा रे मेघा रे, कितना प्‍यारा वादा, किसी राह पे, रेशमांच्‍या रेघांनी, संधीकाली या अशा, रहे ना रहे हम, हसता हुआ नुरानी चेहरा अशी अनेक सुमधुर गाणी सादर झाली. जिया जले, चाक धुम धुम आदी गाण्‍यांवर नृत्‍ये सादर करत गायक व नृत्‍य कलावंतांनी रसिक श्रोत्‍यांना खिळवून ठेवले. दीदींच्‍या अलीकडच्‍या काळातील गाण्‍यांचे मॅशप सुध्‍दा सादर करण्यात आले. ऐ मेरे वतन के लोगो, सौगंध मुझे इस मिट्टी की या देशभक्तिपर  गीतांच्‍या माध्‍यमातुन हा गान प्रवास जयोस्‍तुते पर्यंत पोहचला. गायन व नृत्‍याच्‍या माध्‍यमातुन झालेले जयोस्‍तुतेचे सादरीकरण श्रोत्‍यांमध्‍ये राष्‍ट्रभक्‍तीचे स्‍फुलींग चेतवून गेले.
अनेक गीतांना मिळालेला वन्‍समोर गाण्‍यांच्‍या दर्जेदार सादरीकरणावर शिक्‍कामोर्तब करता झाला. सर्वश्री मंगेश देवूरकर, डॉ. राम भारत, अर्पणा घरोटे, प्रणाली पांडे, भावना हस्‍तक, स्‍वरूपा जोशी, राज ताटपल्‍लीवार, प्रविण ढगे, यांनी उत्‍तमोत्‍तम गीते सादर करत वाहवा मिळविली. प्रविण ढगे यांच्‍या उत्‍कृष्‍ट संगीत नियोजनात राम कोडमलवार, पियुष राजगडे, गौरव नन्‍हेट, सोहन कामतकर, विनय पुनसे या वादकांनी मैफिलीला चार चांद लावले. प्राजक्‍ता उपरकर, अनुश्री देवूरकर, पुनम झा आदी चमुने सादर केलेली बहारदार नृत्‍ये कार्यक्रमाचे वैशिष्‍टय ठरली. सुहास दुधलकर यांनी काढलेली दीदीची सुरेखय रांगोळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
संध्‍या विरमलवार, आणि बकुळ धवने यांनी सुरेख निवेदनाच्‍या माध्‍यमातुन दीदींचा जीवनपट श्रोत्‍यांसमोर मांडत दाद मिळविली. मैफिलीच्‍या प्रारंभी दिवंगत योगेंद्रजी उपाख्‍य बाबाजी, लतादीदी, रमेश देव, पं. शिवशंकर शर्मा, बप्‍पी लहरी, केके यांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली. रसिक श्रोत्‍यांच्‍या उदण्‍ड प्रतिसादात संपन्‍न झालेली ही संगीत मैफिल चंद्रपूरकरांच्‍या दीर्घकाळ स्‍मरणात राहील.

A feast of melodious songs that will be remembered for a long time, 'Meri Awaaz Hi Pehchan Hai'.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.